आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासूर्याचे उत्तरायण सुरू झाले आहे. त्यामुळे सूर्य हळूहळू तळपण्यास सुरुवात होत आहे. परिणामी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत १ अंशाने, तर गत पाच दिवसांत ३.८ अंशांनी वाढले आहे. उत्तरेतील अतिशीत वारे वाहून येत आहेत. वातावरण स्वच्छ असल्याने किमान तापमानात ४ अंशांपर्यंत मोठी घसरण झाली आहे. म्हणजेच सायंकाळ ते सकाळी ९ वाजेपर्यंत थंडीचा कडाका राहतो. दुपारच्या सत्रात उन्हाचा चटका जाणवतोय.
पश्चिम विक्षोभाच्या दुसऱ्या टप्प्यातील अतिशीत वारे जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आदी ठिकाणी दाखल झाले आहे. जानेवारीअखेर आपल्याकडे उष्ण, दमट वातावरण राहिले. उत्तरेतील अतिशीत वारे खेचून आणण्यासाठी ते उपयुक्त ठरले. परिणामी गत पाचपैकी ४ दिवसांत थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमान ९.६ ते ९.१ अंश सेल्सियसदरम्यान म्हणजे नीचांक पातळीवर नोंदवले गेले. थंडीचा हा शेवटचा टप्पा आहे. सूर्य जसजसा उत्तरेकडे सरकत जाईल तसतशी तापमानात वाढ होऊन उन्हाळा ऋतू जाणवायला व त्याचे चटके बसायला सुरुवात होईल. मात्र, त्यासाठी आणखी पंधरा दिवसांचा अवधी आहे. तोपर्यंत थंडीचा मुक्काम राहणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.