आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध विकासकामे:हर्षवर्धन-मंत्री दानवेंची भेट पोलिसांनीच नाकारली

कन्नड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी रविवारी देवगाव रंगारी व कन्नड शहरात आले होते. या पार्श्वभूमीवर कित्येक वर्षांपासून औरंगाबाद, कन्नड, चाळीसगाव, धुळे या रेल्वेमार्गासाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शनिवारी एका व्हिडिओच्या माध्यमातून मंत्री दानवेंना भेटून निवेदन देण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच स्थानिक पोलिसांनाही निवेदन दिले हाेते. परंतु, कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा समाेर करून दानवेंना भेटता येणार नसल्याबाबतचे पत्र रविवारी देवगाव रंगारी पोलिसांनी जाधवांना दिले. जाधवांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जाधव व दानवे यांच्यातील कौटुंबिक वाद संपुष्टात येणार असल्याची चर्चा हाेती. याकडे सर्व तालुकावसीयांचे लक्ष लागून होते.

जनतेने ओवाळायचे का? : केंद्रात रेल्वेमंत्री असताना तुम्हाला भेटता येत नसेल आणि औरंगाबाद, कन्नड, चाळीसगाव, धुळे रेल्वे कधी होणार हा प्रश्न ३० वर्षांपासून प्रलंबित असेल तर मग तालुक्यातील जनतेने तुम्हाला ओवाळायचे का? आता सर्व जनतेने त्यांना एकच विचारायचे, आमची रेल्वे कधी होणार? आणेवारी, पीक विमा, महावितरण, निराधारांना न्याय मिळवून द्यायला आम्ही सक्षम आहाेत. तुम्ही ज्या खात्याचे मंत्री आहात त्या खात्याचे काम पहिले करा. काम होत नसेल तर कशाला येता कन्नडमध्ये? असे माजी आमदार जाधव म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...