आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकला संचालनालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या चार महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना विशिष्ट विषयांचे ज्ञान मिळावे यासाठी प्रदर्शन भरवण्यात आले. आज विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी रेखाटलेल्या शंभरहून अधिक कलाकृतींच्या प्रदर्शनातून स्त्री-पुरूष समानता, प्लास्टिकचा वापर अशा सामाजिक विषयांवर कलाकृती रेखाटण्यात आल्या.
शासकीय कला महाविद्यालयात गुरुवारी शासकीय कला महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले. त्याचे उद्घाटन ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, श्रीकांत उमरीकर यांच्या हस्ते झाले. या वेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. रमेश वडजे, समन्वयक मारुती शेळके, डॉ. अंबादास जाधव उपस्थित होते.
लांजेकर म्हणाले, चित्र, संगीत, कला, भाषा अशी वेगवेगळी माध्यमे असली तरी त्याचा आशय एकच आहे. या कला प्रदर्शनात १०० हून अधिक कलाकृती तसेच विविध प्रकारची शिल्पे मांडण्यात आलेली आहेत. स्मिता किंकाळी यांनी ‘प्लास्टिकचा वापर टाळा’ हा विषय मांडताना प्लास्टिक जाळून पेंटिंग तयार केले, तर प्रा. विजय सुरकर यांनी कॅलिग्राफी कंपोझिशन पेंटिंग रेखाटले.
ब्रशऐवजी केला रोलचा वापर
पूर्वी महिला-पुरुष दोघेही केस लांब ठेवत. परंतु आज महिलांवरच केस वाढवण्याचे बंधन आहे. महिलांवर संस्कृतीचे दडपण टाकले जाते, पुरुषांवर नाही. स्त्री-पुरुष समानता हवी, असा संदेश मी दिला. ब्रशला वापर न करता रोलचा वापर केला. - प्रा. मारुती शेळके, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट
विद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाढेल
प्रदर्शनात ३० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. चित्रकार होण्यासाठी व्हिज्युअल सेन्स हवा असतो. तो या माध्यमातून वाढवण्याचा प्रयत्न आहे. डॉ. गणेश तरतरे, प्राध्यापक, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.