आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राज्यात औरंगाबादचे किमान तापमान 6 अंशांनी जास्त; नांदेड, अहमदनगर, सोलापूर दुसऱ्या क्रमांकावर; असह्य उकाड्याने अंगाची लाही लाही

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगालच्या उपसागरावरील असनी चक्रीवादळ आणि वाळवंटी प्रदेशातून कमी हवेचा दाब असलेल्या शहरांकडे उष्ण वारे वाहून येत आहेत. परिणामी राज्यातील प्रमुख शहरांच्या तुलनेत औरंगाबादचे किमान तापमान सलग दोन दिवस सरासरीपेक्षा सहा व सात अंश सेल्सियसने जास्त नोंदवले गेले. यंदाच्या मोसमात कमीत कमी तापमान मंगळवारी ३०.२ आणि बुधवारी २९.९ अंश सेल्सियस उच्चांक पातळीवर गेल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळा व हवामान विभागाने घेतली आहे. नांदेड, अहमदनगर व सोलापूरचे किमान तापमान ५ अंशांनी जास्त राहिले. हवामानात वेगाने व अनपेक्षित बदल होत आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात ९ मे रोजी कमाल तापमान ४३.२ अंश सेल्सियस उच्चांक पातळीवर गेले होते. कमी हवेचा दाब, उष्ण वारे तापमानवाढीस कारणीभूत ठरत आहे. १० मे रोजी शहर व परिसरात अंशत: ढगांचे आच्छादन राहिले. सूर्याचा प्रकोप आणि उष्ण वाऱ्यामुळे पारा ४२.८ होता. ११ मे रोजी ४१.७ अंश तापमान राहण्याची नोंद झाली. १ ते ८ मेपर्यंत किमान तापमान २३.४ ते २६.५ आणि ९ ते ११ मेदरम्यान किमान तापमानही २८.८, ३०.२ आणि २९.९ वर गेल्याने दिवस-रात्रीच्या वातावरणातील उष्मा प्रचंड वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...