आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघाटी रुग्णालयात वाढीव ७०० बेडला मान्यता द्या, अशी मागणी प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. त्यावर देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. देशमुख यांनी मुंबईत आढावा बैठक घेतली. त्यास वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर, उपसचिव प्रकाश सुरवसे, वैशाली सुळे आदी उपस्थित होते. डॉ. रोटे यांनी प्रशासकीय अधिकारी, अधीक्षकाच्या पात्रता निश्चित करणे, कार्यक्षम वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी नियमितरीत्या भरणे, वर्ग चारची पदे भरणे आदी मागण्या केल्या. सध्या घाटीत ११७७ बेड आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अतिरिक्त ७०० बेड चालवावे लागतात. त्यामुळे निधी, औषधी, सर्जिकल उपकरणे, यंत्रसामग्रीचा तुटवडा पडतो. म्हणून ७०० बेडला मान्यता द्यावी, असा मुद्दा डॉ. रोटे यांनी मांडला. प्रभारी अधिष्ठातांच्या मागणीनुसार परिचारिका भरतीची जाहिरात काढून जागा तातडीने भराव्यात. वैद्यकीय शिक्षण विभागातील अध्यापकीय, तृतीय, चतुर्थ श्रेणीतील रिक्त जागा प्राधान्याने भरण्याची कार्यवाही करावी आणि इतर प्रश्न सोडवण्यास गती द्यावी, अशी सूचना देशमुख यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली. मंत्री देशमुख यांच्याशी घाटीच्या प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांनी चर्चा केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.