आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:अर्भकाला शिशुगृहात सोडून मातेने काढला पळ ; पाेलिसांची शाेध मोहिम सुरु

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतीनगर भागातील साकार शिशुगृहाच्या मुख्य गेटवर असणाऱ्या पाळण्यात नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला सोडून मातेने पळ काढल्याची घटना ३१ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता उघडकीस आली. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून शिशुगृहातील कर्मचारी धावत आले. याप्रकरणी विजय बबनराव राजाळे (रा. ज्योतीनगर) यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्भकाला साेडून पळ काढणाऱ्यांचा पाेलिस शाेध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...