आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औराळा:पोटच्या मुलाच्या निधनाने व्याकूळ झालेल्या आईने सोडले प्राण; कन्नड तालुक्यातील औराळा येथील घटना

औराळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पोटच्या तरुण व कर्त्या मुलांच्या निधनाची बातमी आईला समजताच आईने लगेच प्राण सोडल्याची मन हेलावरणारी घटना कन्नड तालुक्यातील औराळा येथे शुक्रवारी घडली. मन हेलावून टाकणा-या घटनेची अधिक माहिती अशी किं, औराळा येथील अनिल तोताराम मिसाळ(50) यांना दहा दिवसापूर्वी कोरानाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील आमदार प्रशांत बंब यांनी उभारलेल्या कोविड सेंटर येथे दाखल केले. पण दोन दिवसानंतर आई भागिरथीबाई तोताराम मिसाळ (80) यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी लासूर स्टेशन येथील कोविड सेंटर मध्ये दाखल केले.

दोघावर एकाच कोविड सेटर मध्ये उपचार सुरू होते. अनिल तोताराम मिसाळ यांची अचानक तब्येत खालावली आणि उपचारादरम्यान (दि.18) ला शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. एकाच कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असल्याने आई भागिरथीबाई एक दोन तासाला आपल्या मुलांच्या तब्येतेची कोविड सेंटरमध्ये गेल्यापासून विचारपूस करत असत. पण रात्रीपासून सतरा,अठरा तास उलटुन गेले तरी दादाची तब्येत कशी आहे कोणीच कसे आपल्याला सांगितले नाही. म्हणून त्या कासावीस होत होत्या.

म्हणून विचारपूस केली असता आपला पोटचा आपल्याला सोडुन गेला हि हद्यपिटाळुन टाकणारी पोटच्या मुलाच्या निधनाची बातमी समजताच मुलांच्या विराहाने आई भागिरथीबाई तोताराम मिसाळ यांनी देखील (दि.19) ला शनिवारी सकाळी प्राण सोडले. एका पाठोपाठ दोघा मायलेकाचा निधनाची बातमी समजताच मिसाळ परिवार सह गावावर शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...