आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहिम:मनपाने शहरातील 11,680 मीटर अनधिकृत केबल्स काढल्या

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च न्यायालयाने शहरातील विविध विद्युत खांबावर टाकण्यात आलेल्या अनधिकृत केबल्स (ओव्हरहेड केबल्स) काढण्याचे मनपास आदेश दिले होते. मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त-२ तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांची या मोहिमेसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली.

अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग व वॉर्ड अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत शहरातील झोन क्र. १ व ५ आणि ७ मध्ये कारवाई करून अंतर्गत रस्त्यावरील विद्युत खांबावरील ११,६८० मीटर केबल काढण्यात आली. यात झोन क्र. १ अंतर्गत विविध रस्त्यांवर २७३० मीटर, झोन ५ अंतर्गत विविध रस्त्यांवर ४०५० मीटर आणि झोन ७ अंतर्गत विविध रस्त्यांवर ४९०० मीटर अशी एकूण ११,६८० मीटर अनधिकृत केबल्स काढण्यात आली. सदरील मोहीम ३० जानेवारीपर्यंत सुरू राहील, अशी माहिती निकम यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...