आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:महिनाभरात प्रत्येक नळधारकास महापालिका सहा वेळा पाणी देणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च न्यायालयाच्या आदेशावरून शहरातील ६० टक्के भागात तीन दिवसाआड तर ४० टक्के भागात पाच दिवसाआड याप्रमाणे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. यापुढे प्रत्येक नळ कनेक्शनधारकास महिन्यातून सहा वेळा पाणी मिळणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी दिली. वेळापत्रक माहिती नसणे, शेवटच्या घरापर्यंत पाणी न पोहोचणे, पाण्याची वेळ कमी होणे अशा नागरिकांच्या तक्रारी येत असून पाणीपुरवठा विभाग त्याचे निरसन करत असल्याचे ते म्हणाले.

१ जानेवारीपासून शहरात या नवीन पद्धतीने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यासाठी संबंधित भागातील लाइनमन, पर्यवेक्षक आणि कनिष्ठ अभियंत्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दर १५ दिवसांनी हे वेळपत्रक बदलणार आहे. ४० टक्के भागाला दर तीन दिवसांआड तर ६० टक्के भागाला पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

जेल-बेल अ‍ॅपवरून पाण्याची माहिती स्मार्ट सिटीने तयार केलेल्या जेल-बेल अ‍ॅपवरून कोणत्या भागाला कधी पाणी येणार याबद्दलची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये जेल-बेल अ‍ॅप डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. अ‍ॅपवरून एक दिवस अगोदर पाण्याची माहिती मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...