आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरगरीब रुग्णांना अत्यल्प शुल्कात रक्त तपासणी:महापालिका 1 कोटी खर्चून उभारणार डायलिसिस सेंटर

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरवासीयांचे आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी महापालिकेने २०२३-२४ या वार्षिक अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद केली आहे. यातून १ कोटी खर्च करून अत्याधुनिक डायलिसिस सेंटर उभारण्यात येणार आहे. १० कोटींच्या निधीतून नागरिकांना आराेग्य सुविधा दिल्या जाणार आहेत. मेल्ट्रॉन रुग्णालयात ५० लाखांचे रक्त संकलन केंद्र तसेच एनआयसीयू केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ६० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांग पुनर्वसन व उपचार केंद्रही (फिजिआेथेरपी) उभारले जाणार आहे. यासाठी ५० लाख खर्च केला जाणार आहे. मध्यवर्ती निदान प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी एक कोटीची तरतूद केली आहे. शहरातील गोरगरीब रुग्णांना अत्यल्प शुल्कात रक्त तपासणी, डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी व इतर चाचण्या उपलब्ध करून दिल्या जातील. मनपा रुग्णालयांचे आधुनिकीकरण व आवश्यकतेनुसार देखभाल, दुरुस्ती, विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ८.२० कोटींची विशेष तरतूद केली आहे.