आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली जुन्या शहरातील रस्ता रुंदीकरण माेहीम मनपा पुन्हा हाती घेणार आहे. २०११ मध्ये तत्कालीन मनपा आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी गुलमंडीसह अनेक भागातील रस्ते रुंद केले होते. आता ११ वर्षांनंतर प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पुन्हा सुरू हाेणार आहे.
मिल कॉर्नर येथील रुंदीकरण सध्या मनपाच्या अजेंड्यावर आहे. नंतर अन्य रस्ते हाती घेण्यात येतील. रंगार गल्लीतील रस्ता रुंदीकरण मागील दोन दशकांपासून थांबले आहे. मोजक्याच मालमत्ताधारकांमुळे रंगार गल्लीत वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय.
त्याचप्रमाणे बारुदगर नाला, कुंभारवाडा, पानदरिब्याकडे जाणारा रोड, शहागंज रुग्णालयाजवळील रोड, जिन्सी ते जालना रोड आदी अनेक रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. आता जी-२० परिषदेच्या निमित्ताने काही रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याची माेहीम मनपाने सुरू केली. त्यामुळे पुन्हा एकदा रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला. दरम्यान, यासंदर्भात प्रशासक डॉ. चौधरी यांनी सांगितले की, जळगाव रोडवरील सर्व्हिस रोड मनपाच तयार करणार आहे.
यादी तयार करण्याचे निर्देश
काही अतिक्रमणे हटवण्यात आली. छोट्या-छोट्या कारणांसाठी रस्ते रुंद करण्याची मोहीम मागे पडली आहे. मनपाने भूसंपादन केलेल्या रस्त्यांच्या सद्य:स्थितीसंदर्भात यादी तयार करण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले आहेत. त्यानंतर पुढील कारवाई होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.