आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामूल्यांच्या बदनामीची मोहीम उभी करून गांधी विचारांना संपवले जात आहे. देशातील अराजकता रोखण्यासाठी गांधी विचारांचीच गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे गांधी भवनात रविवारी आयोजित व्याख्यानात ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी ‘गांधी : काल आज उद्या’ या विषयावर विचार मांडले. कार्यक्रमाला डॉ. झाकीर पठाण, संस्थेचे विश्वस्त प्रा. मच्छिंद्र गोर्डे, डॉ. शेख इक्बाल मिन्ने उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, ‘गांधीवादाची पारदर्शकता देशभर दिसते. १९१५ मध्ये महात्मा गांधींनी देशभर प्रवास केला होता. या घटनेला शंभर वर्षे झाली त्यावर्षी २०१५ मध्ये मी त्या मार्गावर प्रवास करून त्यांना समजून घेतले. गांधी ज्यांना भेटले त्या व्यक्तींच्या वंशजांना भेटलो.
गांधीजींच्या चळवळीतील घटनांचे अचूक वर्ष आणि स्थान सांगणारे साधारण कुटुंबातील बिहारी तरुण भेटले. आपण वाचतो खूप पण विचार करीत नाही. माहितीचे पोतडे म्हणजे ज्ञान नसून वाचनाचे ज्ञानात रूपांतर झाल्यास परिस्थितीची उकल होईल.गांधीजी आणि गांधी विचार यांच्या विरोधात व्हॉट्सअॅप विद्यापीठातून मोहीम सुरू असते. वाचन आणि विचाराचा अभाव असलेले लोक मेसेजेस फॉरवर्ड करतात. सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग आणि गांधी यांच्यासंबंधी चुकीची माहिती पसरवून गांधीद्वेष वाढवतात. या अर्धसत्याला पूर्ण सत्यातून उत्तर देण्याची वेळ आली आहे, असेही टकले म्हणाले. डॉ. उमाकांत राठोड यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सविता वावगे यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.