आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समताधिष्ठित समाजाची निर्मिती:जातिअंतासाठी आंतरजातीय विवाहांची गरज : डॉ. कांबळे

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समताधिष्ठित समाजाची निर्मिती करायची असल्यास समाजात विषमता, वैर निर्माण करणाऱ्या जातीचा विध्वंस करणे हाच एक उपाय आहे. त्यासाठी जाती निर्माण करणाऱ्या धर्मग्रंथांचे धर्माधिकार नाकारणारा समाज निर्माण करावा लागेल, असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ठाम विश्वास होता. यासाठी त्यांनी आयुष्यभर अनेक लढे दिले. या मार्गावर चालण्यासाठी आंतरजातीय विवाह घडवून आणणे गरजेचे आहे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले.

मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्रात झालेल्या सहाव्या राज्यस्तरीय बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकरही उपस्थित होते. प्रा. कीर्तिलता पेटकर म्हणाल्या, जोडीदाराची निवड करताना जातीपेक्षा कर्तृत्वाला महत्त्व द्या. या वेळी प्रा. भारत सिरसाट, विलास कटारे, सुवर्णा गायकवाड आदींनी विचार मांडले. बौद्ध धम्माची सामूहिक दीक्षा घेणाऱ्या श्रावण गायकवाड यांचाही सत्कार झाला. मेळाव्यात ७६ वधू व ५४ वरांनी नाव नोंदणी केली. आयोजक रामभाऊ पेटकर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम झाला.

बातम्या आणखी आहेत...