आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठात आविष्कार महोत्सव:3 आणि 4 जानेवारी दरम्यान आयोजन, तंत्रज्ञान व विज्ञानविषयक दृष्टीकोन रुजवण्यासाठी महोत्सव

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नवे वर्ष संशोधनानेच सुरू होणार आहे. 3 अणि 4 जानेवारी दरम्यान ‘आविष्कार’ महोत्सव होत आहे. ‘कोविड’मुळे तीन वर्ष हा महोत्सव झाला नव्हता. तंत्रज्ञान व विज्ञानविषयक दृष्टीकोन विद्यार्थ्यांचा विकसित होण्यास हा महोत्सव कारणीभूत ठरणार आहे.

शैक्षणिक सत्र २०१९ दरम्यान अविष्कार महोत्सव झाला होता. त्यानंतर २०२०, २०२१ आणि २०२२ दरम्यान अविष्कार महोत्सव होऊ शकला नव्हता. आता ३, ४ जानेवारी २०२३ रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पदवी, पदव्यूत्तर पदवी, एमफिल-पीएचडी आणि प्राध्यापकांनी केलेले संशोधनाचे प्रदर्शन या महोत्सवा आयोजित केले जाईल.

मानव्यविद्या, वाणिज्यशास्त्र, विज्ञान, कृषी, अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय-औषधनिर्माणशास्त्र या सहा ज्ञानशाखांचे विद्यार्थी यात सहभागी होतील. प्रत्येक शाखेत महाविद्यालयांना दोन असे एकुण सहा संघ पाठवता येतील. ऑनलाईन नोंदणीसाठी स्वतंत्र ’वेबपोर्टल’ सुरु करण्यात आले आहे. संलग्नित महाविद्यालये व पदव्यूत्तर विभागांनी २२ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे अपेक्षित आहे. त्यानंतर २७ डिसेंबरपर्यंत हार्डकॉपी जमा करता येईल. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी नुकतीच ‘आविष्कार’च्या सल्लागार समितीची बैठक घेतली. बैठकीला कुलसचिव डॉ. भगवान साखळे, ’आविष्कार’चे समन्वयक डॉ. रत्नदीप देशमुख, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. संजय सांभाळकर यांच्यासह सल्लागार समिती सदस्यांची यावेळी उपस्थिती होती.

नवन संकल्पना मांडून संशोधकांनी प्रकल्प सादर करावेत. अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुनील नरवडे, पर्यावरणशास्त्राज्ञ डॉ. सतीश पाटील, डॉ. भारती गोरे, डॉ. वीणा हुंबे, डॉ. स्मिता साबळे, डॉ. सचिन भुसारी, डॉ. सुनील कावळे, डॉ. पुरूषोत्तम देशमुख यांचा समावेश आहे. डॉ. रत्नदीप देशमुख समन्वयक आहेत.

पहिल्या दिवशी मॉडेल, पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन आणि प्रोटोटाईपचे सादरीकरण केले जाणार आहे. यात ज्यांचे बेस्ट असेल त्यांना दुसऱ्या दिवशी संधी दिली जाईल. अंतिम दिवशी फक्त ताकदीचे प्रेझेंटेशन होईल. त्यातून प्रत्येक ज्ञानशाखेतून दोघांना बक्षिसे दिले जातील. यामुळे संशोधनाला चालना मिळेल

-डॉ. रत्नदीप देशमुख, समन्वयक

बातम्या आणखी आहेत...