आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पदवीधर मतदान:लिंबागणेश मतदान केंद्रावर नवदांमपत्याने मतदानाचा हक्क बजावला

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज दिनांक 1 डिसेंबर मंगळवार रोजी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील निवडणूक

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर नवदांम्पत्याने मतदानाचा हक्क बजावत लोकशाही बळकट करण्याचा संदेश दिला.

आज दिनांक 1 डिसेंबर मंगळवार रोजी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील निवडणूक असल्याने सकाळी 11 वाजता लिंबागणेश जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्रावर नवदांमपत्य वर गणेश जनार्दन बांगर महाराज व वधु भक्ति संजय वाघ यांनी शासकीय नियमानुसार कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक अटी मास्क लावून, शारीरीक अंतर पाळत, मतदान कक्षात जाण्यापुर्वी हात धुवून नंतर सॅनिटायझरचा वापर करून मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन बांगर महाराजांनी केले. यावेळी मतदान केंद्रावर उपस्थित माजी सरपंच बाळासाहेब मुळे,गणेश काका मोरे,रविंद्र निर्मळ, विक्की वाणी, मुस्तफा शेख आणि डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी नवदांमपत्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser