आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र हा सर्वात सकारात्मक काळ:नवरात्रीचे नऊ दिवस स्वतःला सर्वोत्तम करण्याचा काळ

औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मन आणि शक्ती - जीवन समृद्ध करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे चार गुण असे देते देवी. आपले जीवन धाडस, समृद्धी, समाधान व सुख या चार स्तंभांवर उभे आहे. हे गुण मनात जागृत करण्यासाठी भगवान विष्णू व रामानेही शक्तीची उपासना केली होती.

धाडस म्हणजे क्षमता ओळखणे, म्हणूनच रामाने केली होती आराधना जीवनात आपण जे काही काम करतो ते आपल्याजवळ नसलेले आपल्याला मिळावे म्हणून करतो. यासाठी आपण आपल्या क्षमतांच्या पुढे जाऊन काम करतो. हे धाडस आपल्याला देवीकडून मिळते. कथा : रावणाशी युद्ध करण्यापूर्वी भगवान रामाने नवरात्रीत अपराजिता देवीची पूजा केली होती. सर्व दिशांनी विजय मिळावा, ही या उपासनेमागची कल्पना होती. नवरात्रीत आपण देवीची पूजा करतो तेव्हा रामासारखे चारित्र्य आणि शक्ती मिळावी, आपण धाडसी व्हावे, अशी आपली प्रार्थना असते.

समृद्धी म्हणजे आहे ते वाढवणे, इंद्राने यासाठीच लिहिले लक्ष्मी स्तोत्र जीवनात कठीण परिश्रमातून आपण संपत्ती, मान-सन्मान, सुख-सुविधा या गोष्टी मिळवतो. या यशाचा सदुपयोग करण्याची समज आपल्याला देवीकडून मिळते. कथा : एकदा माता लक्ष्मीचा अपमान केल्यामुळे स्वर्गाचा राजा इंद्राला दुर्वास मुनींनी समृद्धीहीन केले होते. तेव्हा इंद्राने लक्ष्मीची शक्ती म्हणून पूजा केली व महालक्ष्मी स्तोत्र लिहिले. त्यानंतर त्याची समृद्धी परत आली. नवरात्रीत शक्तीची उपासना करताना आपण, आपले कुटुंब व समाज समृद्ध व्हावा, अशी भावना मनात असावी.

समाधान म्हणजे सर्व स्थितीत आनंद हवा, म्हणूनच पार्वतीचा गुहेत वास आपल्याला जीवनात मिळालेले सुख आणि यशाचा कुटुंबासोबत आनंद घेता यावा आणि त्यातून मिळणारे समाधान कायम राहावे, यासाठी आपण शक्तीची उपासना करतो. कथा : पार्वतीची आई शंकराशी तिचे लग्न लावण्यास तयार नव्हती. पार्वती राजकन्या होती. तिचे जीवन ऐश्वर्याचे होते. तरीही ती शंकरासोबत रानावनात राहण्यास तयार होती. आपले मन समाधानी असावे यासाठी नवरात्रीत आपण गायत्री, सावित्री, सरस्वती, लक्ष्मी या देवीच्या सौम्य रूपांचीही पूजा करतो.

सुख म्हणजे समृद्धी वाटून घेणे, हाच देवीचा सर्वात मोठा संदेश आपण आयुष्यात जे काही मिळवले - विद्या, बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि संपत्ती - ते खर्च करणे, गरजूंसोबत वाटून घेणे हाच सर्वात मोठा आनंद आहे, हाच धडा नवरात्र आपल्याला देतो. कथा : एकदा देवी अनेक दिवस तपश्चर्या करत होती. दरम्यान, मगरीने एका मुलाला पकडल्याचे दिसले. देवीने त्याला सोडण्याची विनंती केल्यावर मगर म्हणाली, तू मला तुझ्या तपश्चर्याचे फळ दिलेस तर मी निघून जाईन. देवीने तिला तपश्चर्येचे फळ दिले. नवरात्र ही देण्याची भावना जागृत करण्याचा दिवस काळ आहे.

धर्माच्या दृष्टीने पं. मनीष शर्मा

तारातारिणी : येथील नवरात्र १६ दिवसांचे ओडिशातील पुरीपासून १७८ किमी अंतरावर पुरुषोत्तमपूर ऋषिकुल्या नदीच्या काठावर वसलेली ही माता तारातारिणी आहे. हे देशातील चार आदिशक्ती पीठांपैकी एक आहे. येथे १६ दिवसांचे नवरात्र असते. या काळात रात्रीही मंदिराचे दरवाजे उघडे असतात. सप्तमी, अष्टमी आणि नवमीला माता गर्भगृहातून बाहेर येते आणि तिला प्रदक्षिणा करतात. याला तंत्र आदि शक्तिपीठ असेही म्हणतात. आदि शक्तिपीठे ही आपल्यातील नैतिक शक्ती जागृत करणारी स्थाने आहेत.

देवतांनी या मंत्राने केली होती शक्ती उपासना मार्कण्डेय पुराणात दुर्गासप्तशतीत देवतांच्या शक्तीच्या उपासनेचा उल्लेख आहे. त्यातील एक श्लोक असा ः विद्या समस्तास्तव देवि भेदा: स्त्रिय: समस्ता: सकला जगत्सु। त्वयैकया पूरितमम्बयैतत् का ते स्तुति: स्तव्यपरा परोक्ति।। म्हणजे जगातील सर्व ज्ञान, कला, कौशल्ये देवीमुळेच आहेत. आणि जगातील सर्व स्त्रिया या देवीचे रूप आहेत. देवी जगात सर्वात शक्तिशाली आहे.