आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:मंदिरांवरील भोंग्यांची संख्या जास्त, परवानग्या मिळवण्यात मशिदी पुढे; पोलिसांचा संवाद सुरू

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावरून सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. याच मुद्द्याला धरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मराठवाड्यातही मनसेच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनानंतर धार्मिक स्थळे पुढे येऊन भोंग्यांची परवानगी मागत आहेत.

विभागातील धार्मिक स्थळांचा विचार करता येथे मंदिरांची संख्या अधिक असून मशिदींची संख्या तुलनेने कमी आहे. पण मशिदींकडून भोंग्यांच्या परवानगीसाठी अर्ज केले जात आहेत. हिंगोली, नांदेड, जालना, बीड या जिल्ह्यांत मंदिरांकडून परवानगीसाठी तुलनेत कमी अर्ज येत असल्याचे त्या त्या जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीवरून दिसते.

हिंगोली
मंदिरे : 3500 परवानगी : 1300
मशिदी : 642 परवानगी : 600

जिल्ह्यात १९०० मंदिरांवर पूर्वी भोंगे होते. १३०० भोंग्यांना परवानगी मिळाली असून उर्वरित ठिकाणचे अर्ज प्राप्त झाले.

भोंग्यांबाबत मर्यादेचे पालन करा
हिंगोली जिल्ह्यात सर्व धार्मिक स्थळांना अर्जानुसार भोंग्यांना परवानगी देण्यात आली आहे. दिलेल्या अटी व शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे. दिलेल्या वेळेत व आवाजाची मर्यादा पाळावी. नागरिकांना अडचणी असल्यास त्यांनी पोलिस विभागाशी संपर्क साधावा.
- एम. राकेश कलासागर, पोलिस अधीक्षक, हिंगोली.

बीड मंदिरे : 3500 परवानगी : 30 मशिदी : 750 परवानगी : 329
मागील आठ दिवसांत बीड जिल्ह्यातून धार्मिक स्थळांवर ध्वनिक्षेपक बसवण्यासाठी ४३३ अर्ज पोलिसांकडे आले आहेत.

पोलिस ठाणेस्तरावर परवानगी
जिल्ह्यात धार्मिक स्थळांसाठी ध्वनिक्षेपकांना परवानगी घ्यावी, असे सांगितले गेले आहे. पोलिस ठाणे स्तरावरून ही परवानगी दिली जात आहे. ५ मेपर्यंत ४३३ धार्मिक स्थळांचे अर्ज आले होते. पैकी ३५९ जणांना परवानगी दिली आहे. उर्वरित अर्जांबाबत प्रक्रिया सुरू आहे. मंदिरांचे ४० अर्ज होते पैकी ३० ठिकाणी परवानगी दिली आहे तर मशिदींना ३२९ ठिकाणी परवानगी दिली आहे. - सुनील लांजेवार, अपर पोलिस अधीक्षक, बीड.

नांदेड
मंदिरे : 3,552 परवानगी : 1985 मशिदी : 639 परवानगी : 639

जिल्ह्यात एकूण ४,५९६ धार्मिक स्थळे आहेत. यात गुरुद्वाऱ्यातील ३३ व बुद्ध विहारातील ३७२ पैकी २५७ ठिकाणी भोंग्यांसाठी परवानगी.

..तर तत्काळ संपर्क साधा
काही अनुसूचित प्रकार घडल्यास तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन
- नीलेश मोरे, अपर पोलिस अधीक्षक, नांदेड.

जालना
मंदिरे : 1661 परवानगी : 02 मशिदी : 554 परवानगी : 278

- जिल्ह्यातील १८ ठाण्यांमधून आलेल्या अर्जांची डीएसबीकडून माहिती घेतली जात आहे.
- ५ मेपर्यंत ३००च्या जवळपास परवानगीसाठी अर्ज
- ५५ डेसिबल आवाज ठेवावा, मंदिर, मशिदीवर दोनच भोंगे ठेवण्याच्या नोटिसा काढणे सुरू आहे.

नियम, अटी समजावून सांगत आहोत
पोलिस अधिकारी, कर्मचारी मंदिर, मशिदीमध्ये जाऊन संवाद साधत आहेत. नियम, अटी समजावून सांगत नोटिसा देत आहोत.
- विक्रांत देशमुख,अपर पोलिस अधीक्षक, जालना.

बातम्या आणखी आहेत...