आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पशुगणना:देशात २२ वर्षांत गाय-बैलांच्या संख्येत 22.5 % घट; आता 1.39 कोटी पशू, 1997 मध्ये महाराष्ट्रात होते 1.8 कोटी गाय-बैल

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोवंश वाढले की घटले ?

देशात दर पाच वर्षांनी होणाऱ्या पशुगणनेतच घटत्या गोवंशचा प्रत्यय येतो. सन १९९७ मध्ये महाराष्ट्रात १.८ कोटी गाय-बैल होते ते २२ वर्षांत २२.५ टक्क्यांनी घटले असून सन २०१९ च्या पशुगणनेनुसार त्यांची संख्या आता १ कोटी ३९ लाख एवढी राहिली आहे. यासंदर्भात गोवंशाचे अभ्यासक प्रा. डॉ. अब्दुल समद म्हणाले, गायीची उत्पादकता तिच्या दूध देण्यावर अवलंबून आहे. गायीचे सरासरी वय २० वर्षे असते. तिचा नैसर्गिक मृत्युदर ५ ते १० टक्के आहे. महाराष्ट्रात गाय आणि वासराच्या हत्येवर बंदी आहे. यामुळे गेल्या ५-६ पशुगणनेत गायींची संख्या ७० ते ८० टक्क्यांनी वाढणे अपेक्षित होते. यात २५ ते ३० टक्के वृद्ध, भाकड गायी असायला हव्या होत्या. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे.

२२ वर्षांत फक्त २ लाख गायी वाढल्या : गाय हा धार्मिक श्रद्धेचा मुद्दा आहे. गायीच्या कत्तलीवरून तणावही झाले आहेत. मात्र, बंदी असताना गायींची संख्या वाढण्याऐवजी २०१२ पर्यंत सातत्याने घटत चालली होती. १९९७ मध्ये राज्यात ८७.१३ लाख गायी होत्या. २०१२ पर्यंत गायी घटून ८२.६१ लाखांवर आल्या होत्या. म्हणजेच १९९७ ते २०१९ या २२ वर्षांत गायींची संख्या फक्त २ लाखाने वाढल्याचे राज्य पशुसंवर्धन खात्याच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. दरम्यान, पुण्यातील जमैतुल कुरेश मायनॉरिटी असोसिएशनचे सादिक इसाक कुरेश म्हणाले, आमचा १९७६ च्या गोहत्या बंदी कायद्याला विरोध नसून २०१५ च्या गोवंश हत्या बंदी कायद्याला विरोध आहे. गोवंशात बैलही येतात.

४४ लाख बैल घटले
सर्वाेच्च न्यायालयाच्या १९७६ च्या निर्णयात १६ वर्षांखालील गोवंश हत्येवर बंदी हेाती. २०१५ मध्ये १६ वर्षांवरील गोवंश हत्येवरही बंदी आली. असे असताना गेल्या ५ पशुगणनेत म्हणजे २२ वर्षांत ४४.०२ लाख बैलांची संख्या घटली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे २०१५ च्या बंदी नंतर झालेल्या पशुगणनेत आतापर्यंतची सर्वात मोठी म्हणजे ३१.४ टक्के घट झाली आहे.

गोवंश वाढले की घटले ?
१९९७ ते २०१२ दरम्यान दरवर्षी सरासरी १.७८ लाख गाय-बैल घटत होते. २०१२ ते २०१९ दरम्यान, दरवर्षी २.२२ लाख गाय-बैल घटत गेले. याचाच अर्थ सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय आणि राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू केल्यानंतर गाय-बैल घटण्याचे प्रमाण वाढले आहे.

बातम्या आणखी आहेत...