आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहाटेच्या शपथविधीची वर्षपूर्ती:आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या वर्षी आजच्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सरकार स्थापन केले होते

मागील वर्षी आजच्या दिवशी अख्खा महाराष्ट्र साखर झोपेत असताना राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्यावर्षी आजच्या दिवशी सरकार स्थापन केले होते. त्यावरून सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांची खिल्ली उडवली जात आहे. त्यावर आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल, असे विधान फडणवीस यांनी केले आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार बेईमानी करून आलेले सरकार आहे. हे सरकार किती काळ टिकेल हे माहीत नाही. त्यामुळे यावर आता बोलणे योग्य नाही. मात्र, या पुढे पहाटे नाही तर योग्य वेळी शपथ घेतली जाईल तसेच अशा गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात, असे ते म्हणाले. फडणवीसांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

पंकजा नाराज नाहीत

भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त होते. मात्र फडणवीस यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. ज्या दिवशी माध्यमांकडे बातम्या नसतात, त्या दिवशी पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या दाखवल्या जातात, असे ते म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser