आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय रद्दबातल:जिल्हाधिकारी बीड यांचा आक्षेपार्ह निर्णय रद्दबातल

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

होमिओपॅथिक महाविद्यालय बीड यांनी ‍जिल्हाधिकारी बीड यांचा १९ नोव्हेंबर २०२० व तत्कालीन सामाजिक कल्याण मंञी महाराष्ट्र शासन यांच्या निर्णयाविरुध्द दाखल केलेली रीट याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंजूर करून जिल्हाधिकारी यांचा वादग्रस्त निर्णय रद्द बातल ठरवला.

प्रकरणाची थोडक्यात हकिकत आशी की, मालमत्ता क्र.१-३-१७८९ या होमिओपॅथिक कॉलेज बीडच्या सार्वजनिक न्‍यासाच्‍या बांधकाम परवानगी संदर्भात तत्कालीन सामाजीक न्यायमंञी यांनी विद्यमान आमदारांच्या तक्रारी वरून कायद्याने कोणताही अधिकार नसताना जिल्हाधिकारी बीड यांना बांधकाम परवानगी चौकशीचे आदेश निर्गमित केले.

तत्कालीन जिल्हाधीकारी राहूल रेखावर यांनी तत्परतेने चौकशी लावली. सदर प्रकरणात सार्वजनीक न्‍यासाच्‍या वतीने अशा प्रकारची कार्यवाही विधी समत्त नसल्याचे निवेदन करण्यात आले. जिल्हाधिकारी बीड यांनी प्रकरणात अधिकार नसल्याचा आक्षेप याचिकाकर्त्यांनी मांडूनही, सदर आक्षेप विचारात घेतला नाही. तसेच जिल्हाधिकारी सक्षम अधिकारी नसतानाही अनावश्यक निष्कर्ष नोंदविले. सदर परस्पर विरोधी विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देउन याचिकाकरर्त्यांनी सदर आदेश हा विना अधिकार असल्याचे नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...