आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१९२७ मध्ये लाहोर येथे मे महिन्यात दुपारच्या वेळी मला अटक झाली. ही अटक अकस्मात होती. पोलिस माझ्या मागावर आहेत, याची कोणतीच कल्पना मला नव्हती. एका बागेतून जाताना अचानक मला पोलिसांनी घेरले. मी त्या वेळी खूप शांत होतो, याचे मलाही आश्चर्य वाटले. मला कोणतीच जाणीव झाली नाही. पोलिसांनी मला ताब्यात गेऊन एक महिना पोलिस कोठडीत ठेवले. सीआयडीचे अधिकारी न्यूमन माझ्याजवळ आले. ते म्हणाले, तुम्ही काकोरी या क्रांतिकारी गटाशी संबंधित असल्याचा भक्कम पुरावा आमच्याकडे आहे. तथापि, या गटाच्या हालचालींबाबत माहिती दिल्यास अटक केली जाणार नाही, असेही ते म्हणाले. या प्रस्तावावर मी जोराने हसलो. न्यूमन म्हणाले, तुम्हाला फाशी होऊ शकते. हे ऐकून मला एका क्षणासाठीही भीती वाटली नाही.
मी क्रांतिकारी पक्षाशी (रेव्होल्युशनरी पक्ष) जोडला गेलो. या वेळेपर्यंत मी फक्त एक रोमँटिक आदर्शवादी क्रांतिकारक होतो. आतापर्यंत आम्ही इतरांचे अनुकरण करत होतो. आता जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली होती. मी पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. यामुळे माझे जुने विचार व विश्वास बळकट झाला. हिंसक पद्धती अवलंबण्याची रोमँटिक जागा गंभीर विचारांनी घेतली. गूढवाद आणि अंधश्रद्धेसाठी कोणतीच जागा राहिली नाही. वास्तववाद माझा आधार बनला. बिकटसमयी आधार घेतानाच हिंसा न्यायोचित ठरते. अहिंसा हा सर्व आंदोलनांचा अनिवार्य सिद्धांत असला पाहिजे. ईश्वराची इच्छा आहे म्हणून इंग्रजांची सत्ता आहे असे नाही, तर त्यांच्याकडे ताकद आहे आणि आपण त्यांचा विरोध करू शकत नाही.
स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख टप्पे १९२० : गांधींजींनी पुकारले असहकार आंदोलन स्वातंत्र्य लढ्यातील गांधीजींचे हे पहिले आंदोलन होते. त्यांनी विदेशी वस्तूंवर बहिष्कारासारख्या अहिंसक पद्धतींद्वारे आवाहन केले. खिलाफत चळवळीचेही समर्थन केले.
चौरी-चौरा : २२ जण ठार -१९२२ मध्ये उत्तर प्रदेशच्या चौरी-चौरा येथे जमावाने एक पोलिस ठाणे जाळले. २२ पोलिस ठार झाले. गांधीजींनी व्यथित होऊन आंदोलन मागे घेतले.
स्वराज्य पक्षाची स्थापना -गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेण्याचा मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास व अली बंधूंनी विरोध केला. काँग्रेस वगळता स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.