आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय हस्तक्षेप:आरोग्याच्या कार्यालयाला एक सहसंचालक मिळेना

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद, अंबाजोगाई, नांदेड, लातूर येथील पाच वैद्यकीय, दंत महाविद्यालयांचा कारभार पाहण्यासाठी औरंगाबादमध्ये सहसंचालक कार्यालय सुरू झाले. त्यात सहसंचालक पदावर मंत्रालयातून औरंगाबादेत येण्यासाठी कुणीही उत्सुक नाहीत, अशी बाब समोर आली आहे. अति राजकीय हस्तक्षेपाचे शहर अशी औरंगाबादची प्रतिमा हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे म्हटले जात आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने मंत्रालयीन स्तरावर कुणीही बदलीसाठी इच्छुक नसल्यामुळे पुन्हा प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. मागील पाच वर्षांत केलेल्या कामगिरीच्या माहितीसह १८ ऑगस्टपर्यंत नावे पाठवा, अशी सूचना वरिष्ठांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...