आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाच दिवसांपूर्वी शहरात कुरिअरने आलेल्या ३७ तलवारी व एक कुकरी क्रांती चौक पोलिसांनी जप्त केल्या होत्या. आता पुन्हा विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या उच्चशिक्षित मुलाने ३ हजार रुपयांत ऑनलाइन तलवार मागवली होती. ती तलवार घेण्यासाठी डीटीडीसी कुरिअरच्या कार्यालयात येताच अजिंक्य कैलास चक्रे (२०, रा. जटवाडा रोड) याला पोलिसांनी अटक केली. चक्रे याने २८०० रुपयांमध्ये ऑनलाइन तलवार मागवली होती, तर २०० रुपये कुरिअरचे असे ३ हजारांचे ऑनलाइन पेमेंट केले होते.
क्रांती चौक पोलिसांना डीटीडीसी कुरिअरने एक तलवारसदृश वस्तू निराला बाजार येथील ऑफिसमध्ये आल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे, नरेंद्र गुजर, मनोज चव्हाण, संतोष सूर्यवंशी आणि हनुमंत चाळणेवाड यांनी शहानिशा करून ही कारवाई केली. चक्रेचे शिक्षण बी.एस्सी. पर्यंत झाले आहे. गेल्या पाच दिवसांत क्रांती चौक पोलिसांनी ४१ तलवारी आणि १ कुकरी असा मुद्देमाल जप्त केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.