आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:शिक्षण विभागाचे आदेश पायदळी, पालकांना होतेय शुल्काची मागणी

औरंगाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
  • विशेष म्हणजे ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करा म्हणून संदेश पाठवित आहे

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे काही शाळांकडून पालकांकडे शाळा सुरू होण्याआधीच शुल्काची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अशा शाळांना कठोर कारवाईचा इशारा दिला होता. देशभरातील लॉकडाऊन संपेपर्यंत शाळांनी पालकांना शुल्क भरण्यास भाग पाडू नये अन्यथा शाळांवर कारवाई केले जाईल, असे निर्देश देण्यात आले होते. मात्र शालेय प्रशासनाने शिक्षण विभागाचे हे आदेश पायदळी तुडवत पालकांकडे उर्वरित आणि पुढील वर्गाच्या शुल्क वसुलीसाठी तगादा लावला आहे. लॉकडाऊन काळात देशातील अनेक शाळांनी पालकांना फी भरण्याची सूचना दिली होती. त्यामुळे पालकांमध्ये नाराजी होती. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉक डाऊन असल्यामुळे पालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. तसेच कोरोनामुळे नागरिकांचे कामधंदे, व्यवसाय बंद झालेले आहेत. शिवाय शासनाने सुटी जाहीर केली आहे. असे असतानाही काही खासगी अनुदानित, विनाअनुदानित संस्थाचालकांकडून विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. सध्या आपत्कालीन परिस्थिती लागू असताना अशाप्रकारे पालकांना शैक्षणिक शुल्क भरण्यास भाग पाडणे अयोग्य आहे. त्यामुळे पालकांकडे शुल्काची मागणी करणाऱ्या संबंधित शाळांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. मात्र  शाळा बंद असताना ,विद्यार्थी शाळेत जात नसतानाही, मार्च,एप्रिल, मे पूर्ण वर्षाची शाळा फी, बस फी, परीक्षा फी, भोजन फी  सर्व बाकी फी  पालकांना संस्था मागत आहे. विशेष म्हणजे  ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करा म्हणून संदेश पाठवित आहे. मुलांचे नुकसान होऊ नये या भीतीपोटी पालक मात्र फी पेड करीत असल्याचे सूत्रांकडून कळले. जरी पालक ओरड करत नसेल तर सरकारने याकडे लक्ष देऊन आशा सर्व संस्थेच्या संस्थाचालक यांना तंबी द्यावी व पालकांकडून फिस घेऊ नये, घेतलेली फी परत करावी व चौकशी करून  अशा सर्व संस्थची मान्यता रद्द करण्याची  मागणी मात्र काही पालक करत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात भाजपाचे गटनेता प्रमोद राठोड यांनी विभागीय आयुक्तांना एक निवेदन दिले आहे. त्यात कोरोनाच्या संकटात खासगी शाळांमधील सक्तीची फी वसुली थांबवली जावी अशी मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...