आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर परस्पर विकले:प्लॉटच्या मूळ मालकाने शिक्षिकेचे घर परस्पर विकले

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार वर्षांपूर्वी शिक्षिकेने घेतलेला २४०० चौरस फुटांचा प्लॉट मूळ मालकाने त्यावर बांधलेल्या ४५ लाखांच्या घरासह पुन्हा दुसऱ्यालाच लाखो रुपयांना विकून शिक्षिकेची फसवणूक केली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात नितीन कैलास भुईगळवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अश्विनी गायकवाड (३५) शिक्षिका आहेत. २०१८ मध्ये भुईगळ यांची त्यांच्या पतीसोबत भेट झाली होती. तेव्हा गारखेड्यातील २४०० चौरस फुटांचा प्लॉट विक्रीस असल्याचे सांगितले. गायकवाड कुटुंबाला प्लॉट आवडल्याने १५ लाखांत व्यवहार झाला. तेथे त्यांनी ४५ लाख खर्च करून घरदेखील बांधले. मात्र, काही महिन्यांपूर्वी बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी भुईगळने उलट त्यांच्याविरोधात जवाहरनगर ठाण्यात तक्रार दिली. यादरम्यान त्याने तो प्लॉट नितीन मेघावालेंना विकला.

बातम्या आणखी आहेत...