आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीव्र नाराजी:तीन महिन्यांपूर्वी ड्रेनेजसाठी खोदलेले खड्डे जैसे थे; एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांमध्ये नाराजी

वाळूज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबर महिन्यात बजाजनगर येथील रहिवासी परिसरातील ड्रेनेज लाईनचे काम एमआयडीसी प्रशासनाकडून सुरू करण्यात आले होते. हे काम करताना महाराणा प्रताप चौक ते सिद्धीविनायक गणेश मंदिर या मुख्य मार्गावर ३ फूट खोल आणि ४ फूट रूंद खोदून ठेवलेले खड्डे तीन महिन्यांनंतरही तसेच आहेत. या धोकादायक खड्ड्यांकडे एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिक आणि व्यावसायिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

बजाजनगर येथील मृगनयनी हॉटेलच्या शेजारून राजा शिवाजी विद्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य मार्गावर रस्त्याच्या कडेला खड्डा खोदून तेथे ड्रेनेज करण्यात आले. मात्र, तीन महिने उलटून गेले तरी तेथील मातीचा ढिगारा एमआयडीसीने उचलला नाही. ड्रेनेजचे सिमेंट पाईप, माती, दगड यामुळे २० फुटांचा रस्ता केवळ १० फूट वापरात येत आहे. विद्यार्थी शाळेत जाताना व शाळा सुटल्यानंतर तेथून कार, वाहने जाणे कठीण होते.

खड्ड्यात लोक पडतात आमच्या दुकानासमोर व बाजूच्या हॉस्पिटलसमोर मोठा खड्डा आहे. त्यात रात्री खूप वेळा लोक पडतात. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा सांगितले तर तुम्ही तो खड्डा बुजवून घ्या, असे आदेश ते आम्हालाच सोडतात. - मनोज जैन, व्यावसायिक

कंत्राटदाराला सांगतो दिवाळीदरम्यान हे काम सुरू केलेले आहे. दोन्ही खड्डे बुजवावेत आणि रस्त्याजवळचे मटेरिअल उचलावे, असे कंत्राटदाराला सांगितले आहे. आता पुन्हा त्याला सांगतो. - बी. एस. दिपके, एमआयडीसी अभियंता

बातम्या आणखी आहेत...