आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:आश्वासन न पाळल्याने खेळाडू परत करणार शिवछत्रपती पुरस्कार, शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत अजित पवारांनी दिला होता शब्द

औरंगाबाद (विजय साठे )14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 पेक्षा अधिक पुरस्कार विजेत्यांचे 15 जिल्ह्यात निवेदन

वर्षभरापूर्वी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, अद्यापही ते पाळण्यात आले नसल्याने पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी तिव्र नाराजी व्यक्त करत १९ फेब्रुवारीपूर्वी खेळाडूंच्या हिताचा निर्णय न घेतल्यास येत्या २४ फेब्रुवारी राेजी पुरस्कार परत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. राज्यातील १०० पेक्षा अधिक पुरस्कार विजेत्यांनी विविध जिल्ह्यातील क्रीडा कार्यालयामार्फत हे निवेदन दिले आहे.

उत्कृष्ट कामगिरी करत खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याचे नाव गाजवतात. राज्य सरकारतर्फे त्यांचा सन्मान करण्यासाठी राज्यातील सर्वोच्च असा ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ देण्यात येतो. मात्र, त्यानंतर खेळाडूंचे काय होणार प्रश्न आज पर्यंत अनुउर्त्तीण आहे. खेळासाठी आयुष्य घालवणाऱ्या पुरस्कार प्राप्त खेळाडूंची त्यानंतर फरपट होते. त्यांना पुरस्कार प्राप्त खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये स्थान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जानेवारी राेजी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तात्काळ नोकरीत सामावून घेतले जाईल अाणि नगरविकास मंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर आपल्या नियुक्ती दिल्या जातील असे आश्वासन दिले हाेते. वर्षभरात त्यावर काही कार्यवाही करण्यात अाली नाही. आता लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास खेळाडूंनी पुरस्कार परत करण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

आता मुंबईत धडकणार
आम्ही गेल्या वर्षभरापासून नोकरीसाठी राज्य सरकारच्या दरबारी चकरा मारत आहेत. मात्र, अाश्वासनाशिवाय आमच्या हाती काही लागले नाही. उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याने आम्ही शांत बसलो होतो. आता आमच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास २४ फेब्रुवारीला मुंबईत मंत्रालयात जावून शेकडो खेळाडू पुरस्कार परत करणार आहेत. - प्रा. सागर मगरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते