आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:शहीद तुकाराम ओंबाळे नामफलकाच्या दुरुस्तीसाठी पाेलिसांना वेळच मिळेना

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लोकांचे जीव वाचवण्यासाठी पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी छातीचा कोट करत लढा दिला. यात १४ पोलीस अधिकारी-कर्मचारी शहीद झाले. पाकिस्तानचा दहशतवादी अजमल कसाब या एकमेव जिवंत दहशतवाद्याला पकडून देताना शहीद झालेले ‘शहीद तुकाराम ओंबाळे’ यांचे देशभर कौतुक झाले.

त्यांच्या स्मरणार्थ तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या पुढाकाराने सन २०१२-१३ मध्ये शहीद तुकाराम ओंबाळे सभागृह उभारण्यात आले. त्यावर लिहिलेल्या नावाची दुरवस्था झाली आहे. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने पंधरा दिवसांपूर्वी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्यावेळी नावात तत्काळ दुरुस्ती करण्याचे आश्वासन देणारे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी पंधरा दिवस उलटूनही सुधारित नामफलक न बसवल्याने नागरिकांत नाराजी आहे.

२६ /११ च्या पार्श्वभूमीवर शहीद झालेल्या १४ वीरांना येत्या शनिवारी श्रद्धांजली अर्पण केली जाईल. मात्र, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अनेक महिन्यांपासून शहीद ओंबाळे यांच्या नावाने असणाऱ्या सभागृहावरील नामफलकाकडे दुर्लक्ष होत आहे.पोलिस निरीक्षक गुरमे यांनी सभागृहावरील पत्रे बदलण्याचे काम करताना नजरचुकीने नावाची काही अक्षरे निघून गेल्याचे सांगत लवकरच नामफलकात दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पंधरा दिवसांचा अवधी उलटूनही नावात दुरुस्ती करण्यात आली नाही.

इमारतीची कोनशिलाही गायब
तत्कालीन पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते शहीद ओंबाळे सभागृहाचे अनावरण करण्यात आले होते. पोलिस निरीक्षक किशोर नवले यांच्या प्रयत्नातून हे सभागृह साकार झाल्याने त्यांचेही नाव असणारी काचेची कोनशिला बसवण्यात आली होती. सभागृहावरील पत्रे बदलण्याचे काम केले होते, मग भिंतीवर बसवण्यात आलेली कोनशिला कशी गायब झाली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दोन दिवसांत नेम प्लेट तयार करतो
सिल्व्हर कलरमध्ये मेटल नेम प्लेट सर्वात मोठ्या १० इंच आकारात बनवण्यासाठी ६ हजार रूपये खर्च आणि दोन दिवस लागतात. - संमिसिंग पोथीवाल, कारागीर

बातम्या आणखी आहेत...