आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठ्याचा मेडिकल चालकही ताब्यात:पाेलिसांचा खबऱ्याच विकायचा नशेच्या गोळ्या; तीन जण अटकेत

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका नशेखाराने पोलिसांचा खबऱ्या होत रॅकेटमधील सक्रिय नशेच्या गोळ्यांचे एजंट संपवले. त्यानंतर स्वत:च गोळ्यांची विक्री सुरू करत अजिंठ्याहून तस्करी सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यात एनडीपीएसच्या पथकाने शुक्रवारी तीन एजंटांसह अजिंठ्याच्या मेडिकल चालकाला अटक केली. मिर तौफीक अली ऊर्फ टोनी मिर मन्सूर अली (२६), शेख एजान शेख हिजबरोद्दीन (४८, रा. मिलकॉर्नर व शेख नासेर शेख जमाल (३५, रा. सिटी चौक) अशी आरोपींनी नावे असून शंकर रतनलाल बिंदवाल (रा. रेणुकानगर, अजिंठा) मेडिकल चालक आहे.

दोन दिवसांपूर्वी पथकाला शहरातील तीन रिक्षाचालकांपर्यंत गोळ्यांचा पुरवठा हाेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी संशयितांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. तांत्रिक माहितीनुसार, त्यांनी रिक्षाचालकाला पकडण्यासाठी जळगाव रस्त्यावरील टोल नाक्याजवळ सापळा रचला. शुक्रवारी दुपारी रिक्षाला थांबवण्याचा इशारा केला असता, ताे थांबला नाही. त्यामुळे संशय वाढला व त्यांनी पाठलाग करत त्याला पकडले. त्यात टोनीसह इतर दोघे मिळून आले. त्यांच्याकडे ८४० गोळ्या आढळल्या. ही कारवाई निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हरेश्वर पुगे, औषध निरीक्षक अंजली मिटकर, जीवन जाधव, सहायक फौजदार नसीम खान, विशाल सोनवणे, महेश उगले, धर्मराज गायकवाड, सुरेश भिसे, प्राजक्ता वाघमारे, चालक दत्ता दुभळकर यांनी केली. यातील टोनी पूर्वी पोलिसांना नशेखोरांची माहिती देत होता. त्यात अनेक नशेखोर अडकले. त्यानंतर पोलिसांचा त्याच्यावर विश्वास बसला. परंतु, पथकाने तांत्रिक तपासावर भर दिला असता, रिक्षाचालकांत टोनीदेखील सहभागी असल्याचा दाट संशय आला. त्यानंतर पथकाने त्याच्यावर नजर ठेवली व रिक्षात तो गोळ्यांसकट ताब्यात घेतला.

मेडिकल चालक ताब्यात
अनेक महिन्यांपासून टोनीच्या नेतृत्वात अजिंठ्याचा मेडिकल चालक शंकरकडून गोळ्या आणत असल्याचे वरील तिघांनी सांगितले. त्यानंतर एका पथकाने शंकरला मेडिकलमधून ताब्यात घेतले. त्या वेळी त्याच्या खिशात ८४० गोळ्या आढळल्या. ताे जवळपास १५० ते २०० रुपयांना दहा गोळ्या विकत होता.

बातम्या आणखी आहेत...