आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:वडील-मुलाचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच मारहाण, वाहनाची काचही फोडली

पुसेगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे वडील व मुलाचे भांडण सोडवित असतांना मुलाने नरसी पोलिसांवर हल्ला करून दोन पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केली.  त्यानंतर पोलिस जीपचा एक काचही फोडली. याप्रकरणी नरसी नामदेव पोलिस ठाण्यात रविवारी (17 मे) रात्री उशिरा सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील मारोती धामणे यांच्या सोबत त्यांचा मुलगा महेश धामणे हा भांडण करत होता. दुकान टाकण्यासाठी पैसे दे, तसेच शेती पुन्हा द्या असे म्हणून तो भांडण करत होता. त्यामुळे मारोती धामणे यांनी नरसी नामदेव पोलिस ठाण्यात मुलगा महेश धामणे याच्या विरुद्ध अर्ज दिला होता. त्यानंतर नरसी नामदेव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आर. बी. पोटे जमादार आडे हे पुसेगाव येथे गेले. यावेळी त्यांनी मारोती धामणे व त्यांचा मुलगा महेश धामणे यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र महेश धामणे याने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पोटे यांना मारहाण केली तसेच जमादार दराडे यांनाही काठीने मारले. त्यामुळे दराडे यांच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्याने पोलिस जीपची काच फोडली. हा प्रकार पोटे यांनी नरसी पोलिसांना कळवून आणखी पोलिस कर्मचारी मागवले. त्यानंतर सात ते आठ पोलिस कर्मचाऱ्यांनी महेश धामणे यास वाहनात बसवून नरसी पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणात रात्री उशिरा पोटे यांच्या तक्रारीवरून महेश धामणे याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...