आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आरोग्य यंत्रणेचा बेजबाबदारपणा:चोवीस तासानंतरही पॉझिटिव्ह रुग्ण घरीच; वैजापूरातील सावखेडगंगा गावातील प्रकार

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने घसरत चालली आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणा काहीशी सुस्तावलेली अन् जबाबदार दिसून येत आहे, वैजापूर तालुक्यातील सावखेडगंगा गावातील एका पॉझिटिव्ह रुग्णाला तब्बल चोवीस तासानंतर रुग्णालयात हलविण्यात आले.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्यास सुरवात झाली होती. जुलै महिन्यापासून ग्रामीणमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले. सप्टेंबरअखेरपर्यंत रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. ऑक्टोबर महिन्यात मात्र रुग्णसंख्येत घट होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामीणमध्ये दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ४० ते ६० च्या दरम्यान आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही सुस्तावली आहे. वैजापूर तालुक्यातील सावखेडगंगा येथे एक ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा अहवाल मंगळवारी (दि.१३) सकाळी पॉझिटिव्ह आला. बुधवारी सकाळपर्यंत या रुग्णाला कोविड सेंटर किंवा रुग्णालयात हलविण्यात आले नाही. हि बाब साेशल मिडियाद्वारे पसरल्यानंतर आरोग्य विभागाने वेग घेतला. दुपारी त्यास वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितले की, पॉझिटिव्ह रुग्णांना नेण्यासाठी महसूल विभागाकडून रुग्णवाहिका मिळालेल्या आहेत, वैजापूर तालुक्यात दोन रुग्णवाहिका म्हणून वापरल्या जात आहेत. या गाड्यांचे भाडे थकले आहे.

भाडे द्यायचे कुणी?

महसूल विभागाने ग्रामीण भागासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे भाडे थकल्याने चालकांकडून येण्यास नकार दिला जात आहे. हे भाडे जिल्हा परिषद प्रशासनाने द्यायचे, कि महसूल विभागाने द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम मात्र रुग्णसेवेवर होत असल्याचे दिसून येत आहे.