आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:​​​​​​​हिंगोलीत वीज कंपनीला नगरपालिकेचा दणका, कराच्या थकबाकीपोटी कार्यालय केले सील; वीज कंपनीचे कामकाज ठप्प

हिंगोली3 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • ग्राहकांना त्रास देण्याचा हेतू नाही - डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी हिंगोली

हिंगोलीच्या वीज कंपनीच्या कार्यालयाकडे नळपाणी पुरवठा व इतर करापोटी सुमारे 2 लाख रुपयांच्या थकबाकी पोटी पालिकेने शुक्रवारी ता. 23 विज कंपनीचे कार्यालय सील केले आहे. त्यामुळे या कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे. वीज देयक वसुलीसाठी वारंवार पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत करणाऱ्या वीज कंपनीला पालिकेने चांगलाच दणका दिला आहे. हिंगोलीत सध्या वीज कंपनीकडून थकीत वीज देयकाची थकबाकी वसुली मोहिम सुरु आहे.

घरगुती ग्राहकांसह शासकिय कार्यालय, व्यापारी गाळे यांचा वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. त्यामध्ये हिंगोली शहराच्या नळ पाणी पुरवठा योजनेचाही वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. तसेच काही दिवसांपुर्वीच पथदिव्यांचा वीज पुरवठा देखील खंडीत केला होता. नळ पाणी पुरवठा योजनचा विज पुरवठा खंडीत झाल्यास नागरीकांना त्रास होईल त्यामुळे निधी मिळताच देयक अदा करण्याचे लेखी आश्‍वासन मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी विज कंपनीला दिले होते. मात्र त्यानंतरही वीज कंपनीने नळ पाणी पुरवठा योजेनचा वीज पुरवठा खंडीत केला होता.

दरम्यान, पालिकेची वीज कंपनीकडे नळ योजना व इतर करापोटी सुमारे दोन लाख रुपयांची थकबाकी आहे. मात्र कार्यालय सील केल्यास ग्राहकांना त्रास होईल यामुळे पालिकेने कडक भुमीका घेतली नव्हती. मात्र आज पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्यासह, रत्नाकर अडशिरे, शाम माळवटकर, डी. बी. ठाकुर, बाळू बांगर, हिरेमठ यांच्या पथकाने आज वीज कंपनीचे कार्यालय गाठून मुख्य कार्यालयासोबतच उपविभागीय अभियंत्यांचे कार्यालय सील केले आहे.

आज सकाळी 10 वाजता कार्यालय सील केल्यामुळे कार्यालयात कामासाठी येणाऱ्या अभियंता व कर्मचाऱ्यांना बाहेरच थांबावे लागले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून विज जोडणीच्या थकबाकीच्या कारणावरून नळ योजना व पथदिव्यांचा विज पुरवठा खंडीत करणाऱ्या विज कंपनीला पालिकेने चांगलाच दणका दिल्याचे बोलले जात आहे.​​​​​​​

ग्राहकांना त्रास देण्याचा हेतू नाही - डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी हिंगोली
वीज कंपनीकडे दोन लाख रुपयांची नळ पाणी योजना व इतर कराची थकबाकी आहे. त्यासंदर्भात त्यांना माहितीही देण्यात आलेली आहे. मात्र त्यांनी थकबाकी भरली नसल्याने हि कारवाई करावी लागली आहे. यामध्ये ग्राहकांना त्रास व्हावा हा हेतू नाही. वीज कंपनीने कराची बाकी भरल्यानंतर सील काढले जाईल.

बातम्या आणखी आहेत...