आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लसीवर प्रश्नचिन्ह?:आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस घ्यावी, त्यानंतरच मी घेईन; प्रकाश आंबेडकरांचा पवित्रा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादच्या नामकरणावर औरंगाबादकर जनतेचे मतदान घ्यावे, आंबेडकरांची मागणी

कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या लसीकरणाचा शुभारंभ केला. मात्र यावरून ही आता राजकारण होताना पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी ही लस घ्यावी, त्यानंतर मी घेईन, असा पवित्रा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबादेत आज पत्रकार परिषद घेतली होती. कोरोनाची लस आपण घेणार आहात का? पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 'आधी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घ्यावी त्यानंतर मी लस घेईल' तसेच औरंगाबादच्या नामकरणाबाबत प्रश्न विचारला असता ''नामकरणावरून सुरू असलेल्या या वादाबाबत औरंगाबादेतील जनतेचे मतदान घ्यावे. त्यानंतर निर्णय घ्यावा'' असे ते म्हणाले.