आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘साई फार्मसी’मधील प्रकार:प्राचार्याने कॉलेजमधून चोरले 10 लाख, अर्धे रमीत उडवले ; गुन्हे शाखेेने केली अटक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविद्यालयाच्या अंतर्गत कुरबुरीतून प्राचार्यानेच रागाच्या भरात दहा लाख रुपये चोरून नेले. जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही नेला. चौदा दिवसांपूर्वी साई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी प्राचार्य नीलेश नामदेव आरके (३२, रा. आंबेडकरनगर) याला गुन्हे शाखेने अटक केली. चोरलेले अर्धे पैसे त्याने ऑनलाइन रमी खेळण्यात उडवल्याचे तपासातून समोर आले. आरके सध्या पुणे विद्यापीठातून पीएचडी करत आहे.

चिकलठाणा एमआयडीसीत साई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला २१ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या सुट्या लागल्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या डीव्हीआर, हार्ड डिस्कसह दहा लाख रुपये चोरीला गेले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार आल्यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक अजित दगडखैर यांनी तपास सुरू केेला. महाविद्यालयातील कोणीतरी हा प्रकार केल्याचा दाट संशय दगडखैर यांना होता. त्यांनी २१ ऑक्टोबर रेाजी शेवटी कोण कोण महाविद्यालयात होते याची चौकशी सुरू केली. त्यात त्या दिवशी सायंकाळी संस्थाचालक विक्रांत जाधव यांनी ऑनलाइन कामासाठी आरकेला बोलावून घेतले होते. संस्थाचालकाच्या दालनाच्या तीन चाव्यांपैकी एक आरकेकडे असते हे समोर आले. ५ लाख रुपये जप्त : दगडखैर यांनी सुरुवातीला चौकशी केली. मात्र त्यात आरके नामनिराळा राहिला. परंतु चोरी रात्री अकरानंतर झाल्याने तांत्रिक तपासात आरके तेथे असल्याचे स्पष्ट झाले. दगडखैर यांनी त्याची उलटतपासणी केली. प्रश्नांचा भडिमार सुरू झाल्यावर मात्र आरकेच्या उत्तरामध्ये तफावत आली व तो पकडला गेला. चोरलेल्या दहा लाखांपैकी पोलिसांनी ५ लाख ८ हजार जप्त केले. त्यापैकी काही दिवाळीत खर्च केल्याचे सांगितले. पोलिसांनी मोबाइल तपासला असता ऑनलाइन रमीमध्ये लाखो रुपये उडवल्याचे दिसले.

पुरवणी जबाबात पैशांचा उल्लेख सुरुवातीला केवळ डीव्हीआर व हार्ड डिस्क चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. मात्र, महाविद्यालयाकडून नंतर पुरवणी जबाबात दहा लाखांचा उल्लेख करण्यात आला. चाेरी प्रकरणात आरके व संस्थेच्या अंतर्गत वादाचे कारण असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...