आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीला सूचना:राजकीय इच्छाशक्तीने सुटेल रस्त्यांचा प्रश्न ; दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर आयटीडीपीचा निष्कर्ष

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराची पार्किंग समस्या, वाहतुकीची कोंडी, फेरीवाल्यांचा प्रश्न तत्काळ सुटू शकताे. त्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे, असे मत आयटीडीपीच्या (इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट अँड डेव्हलपमेंट पॉलिसी) तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. शहरातील रस्ते कसे असावे यासाठी त्यांनी मागील दोन वर्षे अभ्यास करून शनिवारी (१९ नोव्हेंबर) मनपा अभियंते, स्मार्ट सिटी आणि आरटीओ अधिकाऱ्यांसाठी स्मार्ट सिटी कार्यालयात कार्यशाळा घेण्यात आली. पुण्यातील अर्बन डिझायनर प्रसन्ना देसाई, आयटीडीपीचे उपव्यवस्थापक प्रांजल कुलकर्णी, श्रीनिवास देशमुख, स्मार्ट सिटीचे अतिरिक्त सीईओ सौरभ जोशी यांची या वेळी उपस्थिती होती.

प्रसन्न देसाई म्हणाले, रस्ते डिझाइन करताना त्याचा वापर व गरजा लक्षात घ्याव्यात. लोकशाही किती खोल आहे हे शहरातील फुटपाथची रुंदी दाखवते. शहर स्मार्ट बनवणे म्हणजे सौंदर्यीकरण नाही. शाश्वत विकासासाठी काम करणे अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी सुमारे १००० स्लाइडचे प्रेझेंटेशन दिले. या कार्यशाळेतील सूचना शहरात पुढील काम करताना विचारात घेतल्या जातील, अशी ग्वाही जोशी यांनी दिली.

आयटीडीपी संस्थेचे काम : आयटीडीपी ही पुण्याची संस्था आहे. शहराचे वाहतूक धोरण, पार्किंग पॉलिसी, रस्ते कसे असावेत यासाठी अभ्यास करते. ही संस्था पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांसाठी मागील सहा वर्षांपासून काम करत आहे. मागील दोन वर्षात त्यांनी औरंगाबादच्या वाहतुकीचा अभ्यास केला आहे.

तज्ज्ञांनी सुचवलेले प्रमुख उपाय : पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी फुटपाथ हवेच { शहराच्या वाहतुकीसाठी सक्षम रस्ते धोरण, समिती हवी. याचे प्रमुख मनपा आयुक्त असावेत. त्यात वाहतुकीवर काम करणारे स्टेक होल्डरचा समावेश असावा. { शहरात एक मॉडेल रस्ता करावा. त्यानुसार इतर कामे करा. { मनपा अभियंते, ठेकेदारांनी इतर शहरात कुठल्या गुणवत्तेचे काम झाले आहे याचा अभ्यास करावा. { वाहतूक नियमन, पार्किंगसाठी स्वतंत्र बजेट ठेवणे अपेक्षित आहे. { रस्ते व फुटपाथ तयार करताना जलवाहिन्या, केबल, ड्रेनेजलाइनचे नियोजन करावे. { शहरात एक तृतीयांश नागरिक विविध कारणांसाठी पायी चालतात. त्यांच्यासाठी सोयी-सुविधा असाव्यात. { रस्ते केवळ वाहतुकीसाठी नव्हे तर विरंगुळा, भेटीगाठीसाठीसुद्धा वापरता आले पाहिजेत. त्या पद्धतीने त्याचे नियोजन करावे. { शहरात फुटपाथ असणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या काही मोजक्या रस्त्यांवर फुटपाथ आहेत. तेसुद्धा व्यवस्थित नाहीत. अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे ते वापरात नाहीत. { फेरीवाले, रस्त्यांवर भरणारे बाजारासाठी स्वतंत्र धोरण हवे. या गोष्टी अमलात आणण्यासाठी समिती असावी. यात मनपा, आरटीओ, पोलिस, नागरिक, व्यापाऱ्यांचा सहभाग असावा. { कुठल्याही विभागाकडून रस्ते तयार होत असले तरी त्याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी.

बातम्या आणखी आहेत...