आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत नामदेवांनी पंढरपूर ते घुमान पदयात्रा करून भागवत धर्माचा प्रचार-प्रसार केला. त्याच मार्गावरून जात आधुनिक समाजाला भागवताचे माहात्म्य सांगण्याचा उपक्रम अनुयायांनी संत नामदेवांच्या ७५२ व्या जयंतीनिमित्त हाती घेतला. यात ११० सायकलस्वारांनी पंढरपूर ते घुमान २३०० किलोमीटरची यात्रा केली. शनिवारी यात्रा औरंगाबादेत आली. या वेळी शिंपी समाजबांधवांनी यात्रेचे स्वागत केले. पादुकांचे पूजनही केले.
या रथयात्रेला ४ नोव्हेंबर रोजी पंढरपुरात सुरुवात झाली होती. भागवत धर्मप्रसारक समिती, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद आणि नामदेव दरबार कमिटी, घुमान यांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा काढण्यात आली. औरंगाबादेत टिव्ही सेंटर येथे पादुका पूजन सोहळ्याला जिल्हाध्यक्ष डॉ. सूनील शिंपी, सुधाकर कापुरे, अजय जाधव, संजय भंडारे, भावना कापुरे यांची उपस्थिती होती. या वेळी पादुकांची आरती करण्यात आली. यात्रेचा उद्या पैठण येथे नाथ मंदिरात समारोप होईल, असेही या वेळी संस्थेचे अध्यक्षांनी सांगितले.
७५ वर्षांपर्यंतच्या महिला सहभागी : यात्रेत ११० जणांचा सहभाग होता. २५ ते ८५ वयोगटाचे १०० पुरुष, तर ४५ ते ७५ वयोगटाच्या १० महिलांनीही सहभाग नोंदवला. सायकलद्वारे २३०० किलोमीटरचा प्रवास महिनाभरात पूर्ण केला. यासाठी ३ महिने सायकलचा सराव करत होते.
पादुका ७० वर्षांपूर्वीच्या प्रेम, बंधुभाव यांच्या आधारे संत नामदेवांनी महाराष्ट्रातून गुजरात, राजस्थानमार्गे पायी जात पंजाबपर्यंत प्रचार केला. सव्वा किलो चांदीच्या ७० वर्षांपूर्वी बनवलेल्या पादुका यात आहेत. सुनील गांगुर्डे, अहिर क्षत्रिय शिंपी समाज पदाधिकारी
अशी देशातील पहिली यात्रा भागवत धर्माच्या शांती, समता आणि बंधुता या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ही यात्रा काढली. धार्मिक कारणासाठी निघालेली ही देशातील पहिलीच यात्रा आहे. सूर्यकांत भिसे, संस्थापक अध्यक्ष, भागवत धर्मप्रसारक समिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.