आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रमांचे आयोजन:धावणी मोहल्ल्यातून निघेल 29 डिसेंबरला मिरवणूक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिखांचे दहावे गुरू श्री गुरुगोविंदसिंग यांच्या प्रकाश पर्वानिमित्त २९ तारखेपासून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.धावणी मोहल्ला येथील गुरुद्वारा भाई दयासिंग भाई धरमसिंग येथे प्रकाश पर्व साजरे केला जाणार आहे. यानिमित्त गुरुद्वाराचे प्रधान नरेंद्रसिंग जबिंदा यांच्या मार्गदर्शनाखाली निशाण साहिब के चोले की सेवा, अखंड पाठ साहिब, नगरकीर्तन, लंगर होईल.२७ तारखेपासून कार्यक्रमांना सुरुवात : २७ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता निशाण साहिबचे चोले देण्यात येईल. सकाळी ९ वाजता अखंड पाठ साहिब सुरू होईल. २८ रोजी सकाळी ७.१५ वाजता आसा दी वार कीर्तन होईल.

२८ डिसेंबर रोजी रण सवाई यांचे कीर्तन : २८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता रण सवाई कीर्तन दरबारात पतियाळा येथील भाई परनामसिंग चौहान यांचे कीर्तन होणार आहे. सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत श्रीनगरचे कीर्तनकार भाई हरजिंदरसिंग कीर्तन करून गुरुबाणीची सांगड घालतील. या वेळी गुरूचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

पंचप्यारे यांच्या नेतृत्वाखाली निघणार मिरवणूक: २९ रोजी सांयकाळी ५ वाजता पंचप्यारे यांच्या नेतृत्वाखाली धावणी मोहल्ला येथील गुरुद्वारा ते उस्मानपुरा गुरुद्वारापर्यंत मिरवणूक निघेल. धावणी मोहल्ला, शहागंज, सराफा बाजार, सिटी चौक, गुलमंडी, पैठण गेट, सिल्लेखाना, क्रांती चौक, गोपाळ टी पॉइंट मार्गे गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभेपर्यंत पोहोचेल. फुलांनी पालखी सजवण्यात येणार आहे.

अखंड पाठाची सांगता २९ तारखेला धावणी मोहल्ला येथे विशेष कार्यक्रम होणार आहे. सकाळी ९ वाजता अखंड पाठ साहेबांची सांगता होईल. सकाळी १०.४० वाजता उस्मानपुरा येथे रागी समूह भाई गुरमीत सिंग, ११ वाजता भाई अमरजितसिंग गुरू तेगबहादूर लंगर साहिबच्या रागी जथ्थेकडून कीर्तन करणार आहेत. सकाळी ११.४० वाजता भाई परनामसिंग कीर्तन करतील. दुपारी १२ वाजता भाई हरजिंदरसिंग यांचे कीर्तन होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...