आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश:वाळूजमध्ये पुट्ठ्यांच्या कंपनीने घेतला पेट

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसी वाळूज परिसरातील अनिल पॅकेजिंग या पुट्ठा बनवणाऱ्या कंपनीला शुक्रवारी पहाटे आग लागली. अग्निशमन विभागाने धाव घेत तीन बंब व दहा खासगी टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. दहा हजार स्क्वेअर फूट परिसरात कंपनी आहे. पहाटे तीन वाजता आग लागताच काही मिनिटांमध्ये आगीने तीव्र स्वरूप धारण केले. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. साडेचार वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अग्निशमन केंद्र अधिकारी अब्दुल अजीज, हरिभाऊ घुगे, जवान विक्रम भुईगळ, सचिन शिंदे, इरफान पठाण यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...