आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश प्रक्रिया:डीटीएएड प्रवेश प्रक्रियेस सुरुवात, 7 सप्टेंबरला जाहिर होणार गुणवत्ता यादी

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

अध्यापक पदविका अभ्यासक्रमाच्या (डीएलएड) प्रवेशाची प्रक्रिया सोमवारपासून सुरु झाली आहे. वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येईल. गुणवत्ता यादी ७ सप्टेंबर रोजी जाहिर होईल. अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पदध्तीने करण्यात येत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. या प्रवेश प्रक्रियेत कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी शाखेतील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून ४९.५ टक्के, तर आरक्षित प्रवर्गासाठी ४४.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक असणार आहे. अर्ज भरण्यासह प्रवेशासंबंधी अधिक माहिती www.maa.ac.in या संकेतस्थळावर पाहता येईल. तात्पूर्ती गुणवत्ता यादी ४ सप्टेंबर रोजी जाहिर केल्यावर अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. यानंतर अंतिम गुणवत्ता यादी ७ सप्टेंबर रोजी जाहिर करण्यात येईल.

असे आहे वेळापत्रक -

३१ ऑगस्टपर्यंत अर्ज नोंदणी करता येईल. अर्जाची छाननी १ सप्टेंबर पर्यंत होईल. तर ४ सप्टेंबर रोजी तात्पूर्ती गुणवत्ता यादी ऑनलाइन जाहिर होईल. त्या दिवसापासून ते ५ सप्टेंबर पर्यंत अर्जाबाबत आक्षेप नोंदिवता येतील. अंतिम गुणवत्ता यादी ७ सप्टेंबर रोजी जाहिर होईल. प्रवेशाची पहिली फेरी ८ सप्टेंबरला सुरु होईल. ११ सप्टेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. दुसऱ्या प्रवेश फेरीस १४ ते १७ सप्टेंबर दरम्यान होतील. तिसऱ्या फेरीसाठी १८ सप्टेंबर रोजी पर्यायी पसंतीक्रम देता येईल. तिसऱ्या फेरीसाठीचे प्रवेश हे २१ ते २४ सप्टेंबर दरम्यान होतील. २५ सप्टेंबर पासून प्रथम वर्ष सुरु होईल.

बातम्या आणखी आहेत...