आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘यादे गालिब’ कार्यक्रम:सृजनाचा दर्जा प्रत्येक वाचकाला भावेल असा असावा ; डॉ. कीर्ती जाव‌ळे यांचे प्रतिपादन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सृजनाचा दर्जा प्रत्येक वाचकाला भावेल असा असावा, असे प्रतिपादन विद्यापीठाच्या उर्दू विभागप्रमुख डॉ. कीर्ती मालिनी जावळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उर्दू विभाग आणि अंजुमन अहले कलम यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ डिसेंबर रोजी “यादे गालिब’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ. कीर्ती जावळे या होत्या. याप्रसंगी मौलाना आझाद महाविद्यालयाच्या उर्दू विभागाचे विभागप्रमुख डॉ. काझी नाविद, अंजुमन अहले कलमच्या अध्यक्षा फिरदोस फातेमा रमझानी खान, शायर जावेद निदा यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. उपस्थितांनी मिर्झा गालिब यांच्या साहित्याला उजाळा दिला. तसेच गालिब यांची शायरीविषयी सविस्तर चर्चा केली.

डॉ. काझी नाविद यांनी आजकाल शहरात साहित्य संमेलने होऊ लागली असून नवीन कवींच्या कविता वाचायला मिळत आहेत याबद्दल समाधान व्यक्त केले. शेख अजहर यांच्या पवित्र कुराण पठणाने सत्राची सुरुवात झाली. मुकद्दिसा आरिफुद्दीन यांनी सूत्रसंचालन केले. यानंतर काव्यसत्राला सुरुवात झाली. या वेळी सबा मुनीर, जुहैब यार खान, शेख मोहंमद, मोमीन अवेस, अब्दुल अजिम आणि इम्रान खान यांनी लेखन सादर केले. डॉ. असगर यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...