आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातब्बल वर्ष होऊनही पाणचक्कीजवळील मेहमूद दरवाजाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते आहे. १० नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा या कामाला नव्याने सुरुवात झाली. पुढील दोन महिन्यात काम पूर्ण होईल, असा दावा स्मार्ट सिटीतर्फे करण्यात आला आहे. दरम्यान, दरवाजातून जाणारा रस्ता वर्षभरापासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुरून वळसा घालून जावे लागत आहे. या कामावर स्मार्ट सिटीतून सुमारे ३८ लाखांचा खर्च होणार आहे.
दीड वर्षापूर्वी स्मार्ट सिटीतून शहरातील ऐतिहासिक आठ दरवाजांची डागडुजी करण्यात आली. मेहमूद दरवाजाची अवस्था खूपच बिकट असल्याने डागडुजीसाठी सुरुवातीला कोणीही पुढे आले नाही. स्मार्ट सिटी प्रशासनाने तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविली. अखेर वर्षभरापूर्वी एका एजन्सीने हे काम घेतले. कामाला सुरुवातही केली. परंतु मध्येच काही दिवस काम बंद, काही दिवस सुरू अशी परिस्थिती आहे. आता दोन महिन्यात हे काम पूर्ण करण्याची सूचना स्मार्ट सिटी प्रशासनाने ठेकेदारास दिली आहे.
पारंपरिक पद्धतीने काम
चारशे वर्षांपूर्वी दरवाजा बनवण्यासाठी जी पद्धत वापरली होती त्याच पारंपरिक पद्धतीने हे काम केले जात आहे. यासाठी चुना, दगड व विटांचा वापर करण्यात येत आहे. चुना भिजवण्यासाठी हौद तयार करण्यात आला आहे. दरवाजाचा जो भाग अधिक कमकुवत झाला आहे तो उतरून तिथे नवीन बांधकाम केले जात आहे. लवकरच दरवाज्याला गतवैभव प्राप्त होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.