आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधक विद्यार्थी जळीत प्रकरण:अहवाल शासनाकडे पाठवणार - कुलगुरुंची माहिती, 16 जणांच्या जबाबाची रिपोर्टमध्ये नोंद

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेत गाजलेल्या 'संशोधक विद्यार्थी' आत्महत्या आणि तरुणीला जाळल्याच्या प्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने तीन सदस्यीय समिती नेमली. या समितीने केलेल्या तथ्यसंकलनाचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती बुधवारी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. या संदर्भात अहवालात सोळा जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. असेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थ्याने शासकीय विज्ञान संस्थेच्या आवारात असलेल्या जैव भौतिकशास्त्र विभागात जाळून घेतल्याची घटना घडल्यानंतर कुलगुरु डॉ. येवले यांनी कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्या अध्यक्षतेखाली तयार केलेल्या समितीमध्ये विभागप्रमुख डॉ. ई. आर. मार्टिन व डॉ.अंजली राजभोज या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती, या समितीला दोन दिवसात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते.

या संदर्भात बोलताना कुलगुरु म्हणाले की, या समितीने शासकीय विज्ञान संस्था, प्राणीशास्त्र विभाग, घाटी रुग्णालय तसेच विद्यार्थी राहत असलेले वसतीगृहाला भेट देऊन 16 लोकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.

या प्रकरणात नेमके काय घडले या संबंधीचा अहवालाची प्रत समिती पोलीस प्रशासन, उच्च शिक्षण संचालक तसेच राज्य शासनाकडेही पाठवण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या विभागांमध्ये विशाखा समिती असून अशा प्रकारची प्रकरणे या समितीकडे येतात मात्र, हे प्रकरण थेट पोलीसांपर्यंत गेले, सदर विद्यार्थीनीने त्या विद्यार्थ्यासंबंधीची तक्रार पोलिसात देऊन त्यांची एक प्रत पोस्टाने विभागालाही पाठवली होती असेही कुलगुरु डॉ. येवले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...