आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील नक्षत्रवाडी भागातील विश्वकर्मा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी ८० लाखांच्या लोकवर्गणीतून ४ हजार चौरस फुटांच्या जागेची खरेदी केली आहे. या तीन मजली वास्तूमध्ये खाली सभागृह आणि वरच्या दोन मजल्यांवर २५ खोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. याविषयी प्रचार-प्रसार करण्यासाठी विश्वकर्मा जयंतीच्या पूर्वसंध्येला जांगिड समाजसेवा संस्थानतर्फे वाहन फेरी काढण्यात आली. यामध्ये १५० दुचाकींवर समाजबांधव सहभागी झाले होते. क्रांती चौकातून फेरीला सुरुवात झाली. या वेळी रथात भगवान विश्वकर्मांची प्रतिमा ठेवली होती. मोंढा नाका, सेव्हन हिल, कॅनॉट प्लेसमार्गे सिडको कामगार चौक, जयभवानी चौक, हनुमाननगर, गजानन मंदिर, सूतगिरणी चौक, दर्गामार्गे नक्षत्रवाडी येथे फेरी पोहोचली. मंदिराच्या प्रांगणात समारोप झाला.
राजस्थानातून आणली होती मूर्ती
नक्षत्रवाडीत असलेल्या भगवान विश्वकर्मा मंदिरात पाच फुटांची राजस्थान येथून आणलेली विश्वकर्मा मूर्ती आहे. १९९५ पासून जांगिड समाजसेवा संस्थानच्या माध्यमातून समाजासाठी विविध उपक्रम राबवले जातात.
आज २ हजार भाविकांसाठी भंडारा, रक्तदान
विश्वकर्मा जयंतीनिमित्त शुक्रवारी २ हजार भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन केले आहे. यात पुरी, भाजी, मसाले भात, तीन प्रकारच्या मिठाया तसेच विश्वकर्मासाठी ५६ भोग होणार आहे. यासोबतच सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचेही आयोजन केले आहे.
२०२५ मध्ये पूर्ण होईल मंदिराचा जीर्णोद्धार
शहरात विश्वकर्मा समाजाची ही वास्तू लक्षवेधी ठरेल. यामध्ये सर्व समाजबांधवांना सोयी-सुविधा दिल्या जातील. संपूर्ण प्रकल्प हा लोकवर्गणीतून उभारला जात आहे. २०२५ मध्ये वास्तू पूर्ण होईल. प्रकाश जांगिड, सचिव जांगिड समाजसेवा संस्थान
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.