आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा छत्रपती संभाजीनगर विभागाचा सलग दुसऱ्या वर्षी निकाल घसरला असला तरी नेहमीप्रमाणे निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. विभागातून गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती संभाजीनगरने अव्वल स्थान राखले असून बीडने दुसरे आणि जालन्याने तिसरे स्थान कायम राखले. परभणी आणि हिंगोली गेल्या वर्षीप्रमाणे पिछाडीवर राहिले
मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी (२५ मे) दुपारी जाहीर केला. छत्रपती संभाजीनगर विभागातून १ लाख ६४ हजार ५४५ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यापैकी १ लाख ५१ हजार १४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागाचा निकाल ९१.८५ टक्के आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण ९४.०५, तर मुलांचे ९०.३२ टक्के आहे. या निकालात मुलींनी बाजी मारली असून त्यांचा निकाल मुलांच्या तुलनेत ३.७३ टक्क्यांनी अधिक आहे. कोरोना काळातील निकालांच्या तुलनेत यंदाचा निकाल ३.१२ टक्क्यांनी घसरला आहे. २०२१ मध्ये ९९.३४, तर २०२२ मध्ये ९४.९७ टक्के निकाल लागला होता. यंदाचा ९१.८५ टक्के निकाल लागला आहे. बीड जिल्ह्याने यंदाही दुसरे स्थान कायम राखले आहे. ३५ हजार ४४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जालना जिल्ह्याचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल २.०२ टक्क्यांनी घसरला आहे. यंदा ३० हजार ६९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
यापैकी २८ हजार २०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात १६ हजार ८३८ मुले, तर ११ हजार ३६४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचा ९०.५७ तर मुलींचा ९३.७९ असा एकूण ९१.८८ असा निकाल लागला असल्याची माहिती बोर्डाच्या वतीने देण्यात आली.
शाखानिहाय निकाल विज्ञान :
९६.५५ % वाणिज्य : ९१.७२% कला : ८४.४५ % एचएससी व्होकेशनल : ८८.५१% टेक्निकल सायन्स : ९०.८३ % एकूण निकाल : ९१.८५ %
हिंगोली शेवटच्या स्थानावर यंदा विभागातून हिंगोली जिल्हा पिछाडीवर राहिला आहे. हिंगोलीतून १२ हजार ९६५ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी ६ हजार १०६ मुले, तर ५ हजार ८४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातील ८३.०४ टक्के मुले, तर ९०.५९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. एकूण ८६.३० टक्के निकाल लागला आहे.
जिल्हानिहाय निकाल छत्रपती संभाजीनगर :
९३.५६ % बीड : ९३.४८ % परभणी : ८७.९२ % जालना : ९१.८८ % हिंगोली : ८६.३ % एकूण : ९१.८५ %
लातूर : निकाल ९०.३७% नांदेड, धाराशिव व लातूर अशा तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लातूर बोर्डाचा निकाल ९०.३७ टक्के लागला. यात ८९ हजार ७८२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ८८ हजार ५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७९ हजार ५७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागात लातूर जिल्ह्याचा सर्वाधिक ९२.६६ टक्के निकाल लागला.
हिंगोली शेवटच्या स्थानावर यंदा विभागातून हिंगोली जिल्हा पिछाडीवर राहिला आहे. हिंगोलीतून १२ हजार ९६५ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी ६ हजार १०६ मुले, तर ५ हजार ८४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातील ८३.०४ टक्के मुले, तर ९०.५९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. एकूण ८६.३० टक्के निकाल लागला आहे.
शाखानिहाय निकाल विज्ञान :
९६.५५ % वाणिज्य : ९१.७२% कला : ८४.४५ % एचएससी व्होकेशनल : ८८.५१% टेक्निकल सायन्स : ९०.८३ % एकूण निकाल : ९१.८५ %
जिल्हानिहाय निकाल छत्रपती संभाजीनगर :
९३.५६ % बीड : ९३.४८ % परभणी : ८७.९२ % जालना : ९१.८८ % हिंगोली : ८६.३ % एकूण : ९१.८५ %
परभणीच्या ९१.८१ टक्के मुली झाल्या उतीर्ण
यंदा परभणी जिल्ह्याचा निकाल ८७.९२ एवढा लागला आहे. जिल्ह्यातून २३ हजार ४४९ विद्यार्थी बसले होते. यातील ११ हजार २२३ मुले तर ९ हजार ३९३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ८४.९१ टक्के मुले तर ९१.८१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.