आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठातील निकालाची तारीख ठरली:पदवी परीक्षांचे निकाल 25 जूननंतर तर प्रवेशासाठी 5 जुलै पासून माहिती भरता येणार

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचा निकाल 25 जून ते 5 जुलैदरम्यान जाहीर होईल. तर विद्यापीठाच्या विभागातील पदव्युत्तर प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीला 24 जून पासून सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात वैय्यक्तिक माहीती तर निकालानंतर 5 ते 15 जुलै शैक्षणिक माहीती विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. अशी माहिती विद्यापीठाच्या प्रवेश समितीचे अध्यक्ष डाॅ. सुरेश गायकवाड यांनी दिली.

विद्यापीठाने काही दिवसांपूर्वीच नव्या शैक्षणिक सत्राचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, पदवी परिक्षांचे निकाल लवकर लावून प्रवेश प्रक्रीया, शैक्षणिक सत्र सुरू करण्यासाठी वेळापत्रक विद्यापीठाकडून निश्चित झाले आहे. त्यात प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीला २४ जूनपासून सुरू होईल.

5 जुलै ते 15 जुलै शैक्षणिक माहीती दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. 6 ते 18 जुलै अर्ज छाणणी प्रक्रीया समांतर पद्धतीने सुरू राहील. त्यातील आक्षेपांसाठी 20 ते 20 जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आला. त्यानंतर गुणवत्तेनुसार इतर राज्य व इतर विद्यापीठाच्या प्रत्येकी दहा टक्के जागांसाठी प्रवेश 28 जुलै रोजी होतील.

त्या फेरीतील रिक्त जागांसाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीच्या 80 टक्के जागांसाठी 30 ते 31 जुलै रोजी प्रवेश प्रक्रीया होऊन 1 ऑगस्टपासून शैक्षणिक सत्र सुरू होईल. रिक्त जागा 3 ऑगस्ट रोजी जाहीर होतील. तर 7 जुलैला स्पाॅट अॅडमीशनची प्रक्रीया संबंधीत विभागात होईल.

बातम्या आणखी आहेत...