आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिवेशन:बँकाचे खाजगीकरण नको ही भूमिका अधिवेशनात  मांडली जाणार - सुनील देशपांडे

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँक ऑफ महाराष्ट्रचे 20 वे अधिवेशन औरंगाबादमध्ये होणार आहे. या अधिवेशनात देशभरातील अकराशे प्रमुख अधिकारी हजर असणार आहेत. यामध्ये बँकांचे खाजगीकरण नको यासह सात वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली जाणार आहे. देशात बँकीग क्षेत्रात 8 लाख नौकऱ्यांची संधी असल्याची माहिती नँशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफीसरचे अध्यक्ष सुनिल देशपांडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या या अधिवेशनाला केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्रचे एमडी आणि सीईओ ए.एस.राजीव तसेच भारतीय मजदुर संघाचे आर्थीक क्षेत्रातील प्रमुख गिरीश आर्या यांची उपस्थिती राहणार आहे.

सरकारी क्षेत्रात सर्वाधिक रिक्त जागा

देशपांडे यांनी सांगितले की सरकारी बँकाच्या क्षेत्रात सर्वाधिक जागा रिक्त आहेत. देशातला 76 टक्के व्यवसाय हा सरकारी बँकाच्या माध्यमातून होतो. त्यासाठी 85 हजार देशभरात शाखा असून तर 8 लाख कर्मचारी आहेत. तर देशातला खाजगी बँकाच्या क्षेत्रामधून 24 टक्के व्यवसाय होत असतांना 30 हजार ब्रँन्चमध्ये सहा लाख कर्मचारी आहे. खाजगी बँकाच्या तुलनेत सराकारी क्षेत्रात कर्मचाऱ्यांची संख्या खुप कमी आहे.त्यामुळे आणखी 8 लाख कर्मचारी देशात लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सहा हजार कर्मचारी रिक्त

देशपांडे यांनी सांगितले की, बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशात दोन हजार शाखा आहेत. यावर्षीचा 3 लाख 37 हजार कोटीचा मार्च 2022 चा व्यवसाय आहे. सध्या बँकेत 12 हजार कर्मचारी असून 18 हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे 6 हजार कर्मचाऱ्यांची गरज एकट्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...