आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:रुपया सर्वात नीचांकी स्तरावर, 77.50 रु.चा झाला 1 डॉलर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सोमवारी आणखी ६० पैशांनी कमकुवत झाला. याची किंमत ७७.५० च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचली. रुपयातील ही घसरण व्याजदरांतील वाढीदरम्यान विदेशी फंडांकडून विक्री सुरू राहणे, कच्च्या तेलाच्या किमतीतील तेजी, अन्य चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलर बळकट होण्याने झाली आहे. याआधी ८ मार्च रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत ७७ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला. सोमवारी सकाळी हा ७७.१७ च्या पातळीवर खुला झाला. व्यवसायादरम्यान ६२ पैसे नुकसानीसह ७७.५२ ची विक्रमी पातळी स्पर्श केली.

बातम्या आणखी आहेत...