आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामंडळाची स्थापना:ब्राह्मण महाशिखर परिषदेच्या संघर्ष यात्रेला 8 रोजी सुरुवात

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, त्यामध्ये ५०० कोटींची तरतूद करावी, यासह विविध १० मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नाहीत. यासाठी ८ नोव्हेंबर ते १४ डिसेंबरदरम्यान ब्राह्मण महाशिखर परिषदेच्या वतीने ब्राह्मण संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. औरंगाबादेत यात्रा १० नोव्हेंबरला येईल, असे अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांनी कळवले आहे. यामध्ये वाडे पाटील, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत दडके, उपाध्यक्ष अशोक वाघ, अनिल कुलकर्णी सहभागी होतील. माहूर येथून यात्रा ८ नाेव्हेंबरला निघेल.ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, त्यात ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी. मुलांची शैक्षणिक फी कमी करावी, यासह विविध मागण्यांसाठी यात्रा निघेल.

बातम्या आणखी आहेत...