आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कांडलीत शाळा भरली अन आखाडाही भरला, येणारे 125 मजूर थांबवायचे कुठे?

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गावकऱ्यांसह स्थानिक प्रशासनही अडचणीत

कळमनुरी तालुक्यातील कांडली येथे बाहेरगावाहून आलेल्या मजूरांनी शाळाही भरली अन जवळपासच्या शेतातील आखाडा देखील भरला आहे,  त्यामुळे पुढील काळात येणारे १२५ मजूर थांबवायचे कुठे? असा प्रश्‍न कांडलीकरांना पडला आहे. गावाकडे येणाऱ्या मजूरांची संख्या वाढत असल्याने गावकऱ्यांसह स्थानिक प्रशासनही अडचणीत सापडले आहेत.हिंगोली जिल्हयात बाहेरगावाहून येणाऱ्या मजूरांची संख्या लक्षात घेता शाळेच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या इमारतीमधे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून विद्युतीकरण देखील करण्यात आले आहे. आता गावांमधून मजूर आल्यानंतर त्यांना तातडीने शाळेत क्वारंटाईन केले जात आहे.

दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील कांडली येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत क्वारंटाईन सेंटरसाठी ताब्यात घेण्यात आली. मागील आठवड्यात आलेल्या ५० मजूूरांना या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. शाळेच्या ११ खोल्यांमधे हे मजूर राहू लागले आहे. त्यांच्या भोजनाची तसेच शुध्द पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायत व गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. मात्र आज दुपारी पुन्हा २५ मजूूर बाहेरगावाहून आले असून त्यांना कुठे क्वारंटाईन करावे असा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यानंतर माजी पंचायत समिती सदस्य राहूल उर्फ पिंटू पतंगे यांनी पोलिस प्रशसानासोबतच आरोग्य विभागाला माहिती दिली. त्यानंतर आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, उपनिरीक्षक हनुमंत नखाते, जमादार संजय मार्के, राजू जाधव, गजानन मुटकुळे यांनी गावात भेट दिली. त्यानंतर या मजूरांना गावालगतच्या एका आखाड्यावर ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी त्यांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच भोजनाची व्यवस्था केली आहे.

मात्र आता पुढील दोन दिवसांत आणखी १२५ मजूूर गावाकडे परतणार आहे. त्यामुळे आता त्यांना कुठे क्वारंटाईन करून ठेवणार असा प्रश्‍न गावकऱ्यांसह स्थानिक प्रशासना समोर उभा राहिला आहे. ग्रामीण भागातून शाळेची इमारत देखील कमी पडत असल्याने पुढील काळात अडचणी वाढणार असल्याचे चित्र आहे.

आरोग्य प्रशासनाने लक्ष देण्याचे गरज ः राहूल उर्फ पिंटू पतंगे, माजी पंचायत समिती सदस्य

कांडली येथे येणाऱ्या मजूरांची संख्या वाढत आहे. मागील आठवड्यात आलेल्या ५० मजुरांना शाळेत ठेवले तर आज आलेल्या २५ जणांना आखाड्यावर ठेवले आहे. ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या पुढाकारातून त्यांच्या भोजनासाठी व शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. आता यापुढे येणाऱ्या मजूरांना कळमनुरी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवल्यास गावकऱ्यांची अडचण दूर होईल. त्यासाठी आरोग्य विभागाने लक्ष द्यावे.

बातम्या आणखी आहेत...