आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा:सोमवारी उघडणार शाळा, विद्यार्थी मात्र बुधवारपासून येणार ; शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी सर्व शाळांना दिल्या सूचना

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारपासून शाळांना सुरुवात होणार आहे, तर १५ जूनपासून प्रत्यक्ष विद्यार्थी शाळेत येतील. शाळांनी मुलांच्या स्वागताची जंगी तयारी करावी, वर्ग सजवावेत, पालकांच्या भेटी घ्याव्यात अशा सूचना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी सर्व शाळांना दिल्या आहेत. १३ व १४ जून रोजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळा स्वच्छता, निर्जंतुकीकरण करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-१९ जनजागृती, समुपदेशन करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...